देशाच्या कोणत्याही भागात कोरोनाच्या लसीचा तुटवडा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं आहे. “देशातील कोणत्याही भागात कोरोनाच्या लसीचा तुटवडा नाहीये. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या गरजेनुसार लसीचा पुरवठा केला जात आहे.” देशातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हर्ष वर्धन यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी लसीच्या पुरवठ्याबद्दल ही माहिती दिली आहे. देशात कोरोनाची परिस्थिती अजुनही नियंत्रणात आहे, फक्त काही भागांमध्ये अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि लोकांकडून नियमांचं पालन होत नसल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
“गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी आहे, आपल्या देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ९२.३८ इतकं आहे. परंतू सध्याची परिस्थिती चिंतेत भर टाकणारी आहे. आपल्याकडे लॉकडाउनचा एक वर्षाचा अनुभव आहे. यामध्ये काय करायला हवं आणि काय करायचं याची माहिती आपल्याकडे आहे…परंतू अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून काही त्रुटी राहत आहेत. परंतू आपण याआधी ज्याप्रमाणे नियमांचं पालन करत होतो, तशाच पद्धतीने नियमांचं पालन केलं तर वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ शकते.”
25 वर्षांवरील सगळ्यांना लस द्या, उद्धव ठाकरेंची मागणी केंद्र सरकारने फेटाळली
नवीन वर्षात काही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे. टप्प्याटप्प्यात काही गोष्टी रुळावर येत आहेत, परंतू लोक आता नियम पाळताना दिसत नाहीयेत. निष्काळजीपणा हा मोठा चिंतेचा विषय असल्याचंही हर्षवर्धन यांनी बैठकीत सांगितलं. स्थानिक पातळीवर होणारे मोठे लग्नसोहळे, निवडणुकांमधली गर्दी, शेतकरी मोर्चे अशा घटनांमधून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निरीक्षण यावेळी आरोग्यमंत्र्यांनी नोंदवलं. त्यामुळे आगामी काळात या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काय उपाययोजना आखतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘शेजारील राज्यांकडून Oxygen चा पुरवठा केला जावा’, महाराष्ट्रावर का ओढावलीय अशी वेळ?
ADVERTISEMENT