अनेक सुपरहिट गाण्यासह अनेक चित्रपट गाण्यांमध्ये डान्स करताना दिसणारी नोरा फतेही आता कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर तिने स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे.
ADVERTISEMENT
नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नोरा फतेही 28 डिसेंबर रोजी झालेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आली आहे. नोरा कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळत आहे आणि या अंतर्गत तिने डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वतःला क्वारंटाईन केले आहे. सुरक्षा आणि सतर्कतेच्या दृष्टीने नियमानुसार, ती महापालिकेला पूर्ण सहकार्य करत आहेत.’
प्रवक्त्याने आपल्या विधानात असेही स्पष्ट केले की, नोरा फतेहीचे जे फोटो सोशल मीडियावर 28 डिसेंबरचे असल्याचे सांगून व्हायरल होत आहेत, ते प्रत्यक्षात पूर्वीच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ‘अलीकडे नोरा कुठेही घराबाहेर पडलेली नाही. अशा परिस्थितीत या फोटोंकडे दुर्लक्ष करावे, अशी विनंती आहे.’नोरा फतेहीने स्वतःची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि लिहिले की, ‘कोव्हिडचा माझ्यावर वाईट परिणाम झाला आहे. मी गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या सूचनेनुसार बेडवरच पडून आहे. तसेच सुरक्षित रहा आणि मास्क घाला. कोव्हिडचा प्रसार झपाट्याने होत आहे आणि लोकांना त्याचा वेगवेगळ्या प्रकारे त्रास होऊ शकतो.’
ADVERTISEMENT