अमोल कोल्हे लोकप्रियतेमुळे नाही तर निष्ठावंतांमुळे खासदार झाले – NCP आमदाराचा घरचा आहेर

मुंबई तक

• 05:44 AM • 06 Dec 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्यात पक्षातील आमदाराने घरचा आहेर दिला आहे. स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कष्टाने तुम्ही खासदार झाले आहात याचं भान असू द्या अशा शब्दांत NCP चे खेडचे आमदार दिलीप मोहीते यांनी अमोल कोल्हेंना सुनावलं आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा बँक, दुध […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्यात पक्षातील आमदाराने घरचा आहेर दिला आहे. स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कष्टाने तुम्ही खासदार झाले आहात याचं भान असू द्या अशा शब्दांत NCP चे खेडचे आमदार दिलीप मोहीते यांनी अमोल कोल्हेंना सुनावलं आहे.

हे वाचलं का?

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा बँक, दुध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी वाकी, संतोषनगर येथील साई कृपा कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी आमदार मोहिते बोलत होते.

वीर सावरकरांना मराठी माणूस कधीही विरोध करूच शकत नाही, जो वाद झाला तो दुर्दैवी-शरद पवार

मागील २ वर्षांत खासदार अमोल कोल्हे हे मतदार संघात दिसत नाहीत,कामे करत नाहीत म्हणून विरोधकानी अनेकदा रान उठवलं होत मात्र आता मोहितेंनी ही खदखद बोलून दाखवल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या. “अमोल कोल्हे खेड तालुक्यातील कोणताही निर्णय घेताना आपल्याला विचारात घेत नाहीत. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करतात आणि ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेतात, हे बरं नाही. समाजकारण यु ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवढे सोपे नाही असा चिमटा काढत ज्यांनी तुम्हाला योग्य समजून मते दिली त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या”, असा थेट पण बोचरा सल्ला आमदार मोहिते यांनी अमोल कोल्हेंना दिला.

Nagpur MLC Election : बावनकुळेंविरोधात काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंना लक्ष केल्यानंतर पुणे जिल्हा दुध संघालाही आमदार दिलीप मोहिते पाटलांनी लक्ष केल. जिल्हा दुध संघाचा सध्याचा अध्यक्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे. संघातील डांबरट संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने सत्ता उपभोगत आहेत. परंतू पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन दुधाउत्पादकांची लुट करीत आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार केली, त्यात तथ्य आहे. मात्र महाआघाडीचे तीन पक्षाचे सरकार असल्याने कारवाई होऊ शकत नसल्याची खंत मोहीतेंनी व्यक्त केली.

दिलीप मोहिते यांच्या या पक्षविरोधी आणि पक्षातील स्टार प्रचारक असलेल्या खासदारा बद्दल केलेल्या वादग्रस्त बोलण्यामूळे खेड तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत राजकीय कलह सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर अमोल कोल्हे काय बोलणार आणि शरद पवार,अजित पवार मोहितेना सवाल करणार का? हे पाहावे लागणार आहे.

    follow whatsapp