ADVERTISEMENT
तंत्रज्ञानामुळे लोकांचं आयुष्य प्रचंड बदलून गेलं आहे. लोकांचा विशेषत: तरुण वर्गाचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. असं असलं तरी लोक स्वतःची रिलेशनशिप वा इतर खासगी बाबींबद्दल बोलताना संकोच बाळगताना दिसतात.
OkCupid या डेटिंग अॅपने भारतीयांच्या मनात काय सुरू असतं, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलची मतं आता समोर आणली आहे.
डेटिंग अॅपने मतं जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला होता. ज्यात कोणत्या गोष्टीमुळे स्वतंत्र असल्याचं अनुभवता असं विचारण्यात आलं होतं.
यात ३९ टक्के लोकांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर अनेकांनी पर्यटन (३० टक्के), लैंगिक जीवन (२२ टक्के) आणि कला (९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
पैसा की स्वातंत्र्य यापैकी कशाची निवड कराल? असं यूजर्संना विचारण्यात आलं. त्यात ६५ टक्के यूजर्संनी स्वातंत्र्याची निवड केली. तर ३५ टक्के लोकांनी पैशाची निवड केली.
स्वातंत्र्य ही गोष्ट पैशाच्या तुलनेत खूप मोठी आहे, असं मतं काही लोकांनी मांडलं.
रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला स्वातंत्र्य देण्याबद्दल ६८ टक्के यूजर्संनी अनुकूलता दर्शवली. म्हणजे रिलेशनशिपमध्ये असताना जोडीदाराला त्यांची स्पेस दिली पाहिजे असं या यूजर्संचं म्हणणं आहे.
माध्यमांना स्वातंत्र्य आवश्यक आहे का? असंही विचारण्यात आलं. त्यावर ९० टक्के यूजर्संनी माध्यम स्वातंत्र्य गरजेचं असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्यासाठीही कायदा असायला हवा ७६ टक्के यूजर्संना वाटतं.
७३ टक्के यूजर्संचं असं मत आहे की, लॉग टर्म रिलेशनशिपमध्ये राहताना आर्थिक स्वावलंबनासाठी स्वतःचं वेगळं बँक खातं असावं.
स्वातंत्र्य की सुरक्षा यापैकी कशाची निवड कराल? असा प्रश्न सर्वेमध्ये विचारण्यात आला. त्यावर ५८ टक्के यूजर्संनी स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. तर ४२ टक्के यूजर्संनी सुरक्षा महत्त्वाची असल्याचं मत नोंदवलं.
ADVERTISEMENT