मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्ली दुसऱ्या क्रमाकांवर असून देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या 1,431 वर पोहोचली आहे. यापैकी 488 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
ADVERTISEMENT
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,431 वर पोहोचली आहे. यातील 488 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात एकूण 454 रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 167 बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली आहे. दिल्लीत तब्बल 351 रुग्ण आढळून आले. यापैकी 57 रुग्ण बरे झाले आहेत.
Corona : मुंबईत कोरोनाचं थैमान सुरूच! दिवसभरात 5631 रूग्णांची नोंद
कोणत्या राज्यात किती रुग्ण? (कंसात बरे झालेले रुग्ण)
महाराष्ट्र – 452 (167)
दिल्ली – 351 (57)
तामिळनाडू – 118 (40)
गुजरात – 115 (69)
केरळ – 109 (1)
राजस्थान – 69 (61)
तेलंगाना – 62 (18)
हरयाणा – 37 (25)
कर्नाटक – 34 (18)
आंध्र प्रदेश – 17 (3)
पश्चिम बंगाल 17 (3)
ओडिशा – 14 (3)
मध्य प्रदेश – 9 (9)
उत्तर प्रदेश – 8 (4)
उत्तराखंड – 4 (4)
चंदीगड – 3 (2)
जम्मू काश्मीर – 3 (3)
अंदमान आणि निकोबार – 2 (0)
गोवा – 1 (0)
हिमाचल प्रदेश – 1 (1)
लडाख – 1 (1)
मणिपूर – 1 (0)
पंजाब – 1 (1)
एकूण रुग्ण 1431 (488)
ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
मुंबई-327
पिंपरी-26
पुणे ग्रामीण-18
पुणे मनपा आणि ठाणे मनपा-प्रत्येकी 12
नवी मुंबई, पनवेल- प्रत्येकी 8
कल्याण डोंबिवली-7
नागपूर, सातारा-प्रत्येकी 6
उस्मानाबाद-5
वसई-विरार-4
नांदेड-3
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर-प्रत्येकी 2
लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर-प्रत्येकी 1
एकूण-454
ADVERTISEMENT