Omicron Variant : धारावीतील नागरिक निघाला ‘ओमिक्रॉन’ पॉझिटिव्ह!

मुस्तफा शेख

• 12:21 PM • 10 Dec 2021

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला मुंबईतील पहिला रुग्ण बरा झाल्यामुळे दिलासादायक परिस्थिती असताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. टांझानियातून परतलेली एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 24 नोव्हेंबरला मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण बरा झाला असून, […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला मुंबईतील पहिला रुग्ण बरा झाल्यामुळे दिलासादायक परिस्थिती असताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. टांझानियातून परतलेली एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

24 नोव्हेंबरला मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण बरा झाला असून, त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईत आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. महत्त्वाचं म्हणजे दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत हा रुग्ण आढळून आला आहे.

49 वर्षीय व्यक्ती मूळची चेन्नई येथील असून, मागील काही वर्षांपासून धारावीत राहते. 4 डिसेंबर रोजी ही व्यक्ती टांझानियातून मुंबईत आली. विमानतळावरच या व्यक्तीच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

मुंबई-पुण्याला दिलासा! ‘ओमिक्रॉन’ची लागण झालेल्या पहिल्या रुग्णांचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’

टांझानिया हाय रिस्क देशांच्या यादीत नसलं, तरी खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. या व्यक्तीला रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावरच थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर सायंकाळी या व्यक्तीला जाण्याची परवानगी दिली. मात्र, या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. त्यानंतर प्रशासनाने जी वार्डमधील अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली.

त्यानंतर जी वार्डमधील टीमने या व्यक्तीसह त्याला घ्यायला आलेल्या दोघांना थांबवलं आणि त्यानंतर तातडीने अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या व्यक्तीला घेण्यासाठी आलेल्या दोघांचे रिर्पोट निगेटिव्ह आले. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाला कोणतीही लक्षणं नाहीत. महत्त्वाचं म्हणजे त्याने लस घेतलेली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    follow whatsapp