Mahad Death: लसीकरणानंतर काही तासाने बालकाचा मृत्यू; आई-वडिलांचा आरोप

मुंबई तक

13 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:50 AM)

चंद्रहास नगरकर, रायगड Child died after vaccination in Mahad: महाड: महाड (Mahad) तालुक्यातील वाघोली आदिवासीवाडी येथील एका सहा महिन्याच्या बालकाचा लसीकरण (Vaccination) झाल्यानंतर अवघ्या काही तासातच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला असल्याची खळबळजनक घटना गुरुवार (12 जानेवारी) घडली आहे. या घटनेने पीडित कुटुंबीयांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांनी याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार […]

Mumbaitak
follow google news

चंद्रहास नगरकर, रायगड

हे वाचलं का?

Child died after vaccination in Mahad: महाड: महाड (Mahad) तालुक्यातील वाघोली आदिवासीवाडी येथील एका सहा महिन्याच्या बालकाचा लसीकरण (Vaccination) झाल्यानंतर अवघ्या काही तासातच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला असल्याची खळबळजनक घटना गुरुवार (12 जानेवारी) घडली आहे. या घटनेने पीडित कुटुंबीयांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांनी याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. (one child died a few hours after vaccination sensational incident in mahad taluka)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. मालती प्रदीप पवार (वय 23 वर्ष) मयत बालकाची आई हिने दिलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील आरोग्यसेविका व एक सहकारी महिला गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी त्यांच्या वाघोली आदिवासी येथील घरी येऊन बालकाला दुपारी 12 वाजेच्या सुमारास 6 महिन्याचे 3 इंजेक्शन देऊन 2 डोस पाजले.

पुणे: रस्त्याच्या कडेला पडलेल्या वायरचा शॉक बसून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

यानंतर एका गोळीचे 4 तुकडे करून जर बालकास ताप आला तर दुधातून देण्यास सांगितले. बालक झोपेतून उठल्यावर रडू लागलं त्यामुळे मालती यांनी बालकाला दुधातून गोळी दिली. त्यानंतर अचानक बालकाचे हातपाय वाकडे होऊन त्याचे डोळे फिरू लागले. त्यामुळे मालती यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बालकास प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे आणले परंतु तिथे बालकाला मृत घोषित करण्यात आले.

लसीकरणामुळेच आपल्या बाळाचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मयत बालकाच्या माता-पित्याकडून करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाने ही शक्यता नाकारली असल्याचे समजते. पण या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, भिवंडीतली घटना

लसीकरण झालेली इतर सर्व बालके व्यवस्थित सुखरूप असून या एकाच बालकाचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप कोडेच असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकणार आहे. मात्र या घटनेमुळे पीडित कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एस आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पी पी शास्त्री हे करीत आहेत.

    follow whatsapp