“एकमेकांना गद्दार म्हणून राज्यातले प्रश्न सुटणार आहेत का?” विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल

मुंबई तक

10 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:47 AM)

शिवसेनेत दोन गट पडले आहेत, तसंच या दोन्ही गटांमधला वाद जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव हे दोन्ही गोठवलं आहे. अशात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनाही एक सवाल केला आहे. लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा करून टाकला आहे अशीही टीका अजित पवार यांनी केली. […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेत दोन गट पडले आहेत, तसंच या दोन्ही गटांमधला वाद जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव हे दोन्ही गोठवलं आहे. अशात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनाही एक सवाल केला आहे.

हे वाचलं का?

लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा करून टाकला आहे अशीही टीका अजित पवार यांनी केली. बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम आणि गव्हाण पूजन हे अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

शिवसेनेतले नेते एकमेकांना गद्दार म्हणत आहेत. पण त्यामुळे राज्यातील प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख नागरिकांचे रोजगार गेले आहेत, देशात महागाई वाढली आहे त्यावर कुणीही काहीही बोलायला तयार नाही. माणसं फोडण्याचंच काम सुरू आहे लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा मांडला आहे. सध्या राज्यात जो काही गोंधळ सुरू आहे त्यामुळे कोणतं सरकार किती दिवस टिकेल ते काही अधिकाऱ्यांनाही समजत नाही असाही टोला अजित पवार यांनी लगावला.

गद्दार गद्दार म्हणून काय होणार आहे?

शिवसेनेतल्या दोन्ही गटांचे नेते एकमेकांना गद्दार गद्दार असं संबोधत आहेत त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे राज्यातले प्रश्न सुटणार आहेत का? राज्याच्या विकासावर या राजकारणाचा परिणाम होतो आहे. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही अजित पवार यांनी हा प्रश्न विचारला आहे.

    follow whatsapp