अजित पवार संतापले… काढलं संजय राठोडांना अडचणीत आणणारं प्रकरण

मुंबई तक

22 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:31 AM)

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी उपस्थित केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. दिशा सालियन प्रकरण : देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले? प्रचंड गदारोळात काम सुरू झालं. गोंधळ […]

Mumbaitak
follow google news

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी उपस्थित केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

हे वाचलं का?

दिशा सालियन प्रकरण : देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

प्रचंड गदारोळात काम सुरू झालं. गोंधळ सुरूच राहिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं की, ‘मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण आधीपासून आहे. यासंदर्भातील ही जी मागणी आहे, निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील, ते त्यांनी द्यावेत. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल.’

देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. ‘प्रश्नोत्तराच्या तासापासून सत्ताधारी पक्षाचे सदस्य हे वेगवेगळी चर्चा करत होते. आधी तालिका अध्यक्ष बसलेले होते. त्यावेळी मी, भास्करराव जाधव हात करत होतो. त्यांना बोलू दिलं, तर आम्हालाही बोलू द्या. प्रत्येकाला इथे बोलण्याचा अधिकार आहे. दिशा सालियनच्या मृत्यू संदर्भातील चर्चा काही सदस्यांनी उपस्थित केली. त्यांचा तो अधिकार आहे. खरंतर आपल्याला माहिती आहे की, यात कुणीही राजकीय अंगाने बघू नये,’ असं अजित पवार म्हणाले.

Disha Salian Death ची फाईल उघडली, गदारोळानंतर फडणवीसांची मोठी घोषणा

‘सीबीआयने असा निष्कर्ष काढलेला पुढे आलाय. राज्याचे गृहमंत्रीही चौकशी करू शकतात, त्यांचा अधिकार आहे. राज्य सरकार सीबीआयकडे चौकशी देण्यास सांगू शकतं. सीबीआयने निष्कर्ष काढलेला आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

अध्यक्षांनी पुरवणी मागण्यांवर चर्चा घ्यायची म्हटल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘आपण सांगाल ते आम्हाला मान्य करावं लागेल. आम्हालाही आमची भूमिका… एकतर्फीच ऐकायचं का? आम्ही गप्पच बसायचं का? सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने 2022 मध्ये खुलासा केल्याचं वाचनात आलेलं आहे,’ अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

नागपूर हिवाळी अधिवेशन 2022 Live : दिशा सालियन प्रकरण पेटलं, प्रचंड राडा

दिशा सालियन प्रकरणावर अजित पवार विधानसभेत काय बोलले?

अजित पवार म्हणाले, ‘दिशा सालियन 14 मजल्यावरून तोल जाऊन पडली, असा निष्कर्ष सीबीआयने काढलेला आहे. हा अपघाती मृत्यू असल्याचं सांगितलं. केंद्रीय संस्थांकडे चौकशी दिली जाते. यातही झाली. ती आपली मुलगी असल्यासारखं आहे, त्यामुळे त्यात आणखी बोलून मला तिला बदनाम करायचं नाही.’

‘मधल्या काळात अनेक राजकीय लोकांनी आपापल्या भूमिकेच्या संदर्भात दिशाचा उल्लेख केला. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी सांगितलं की, राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आम्हाला जगू दिलं जात नाही. राजकीय नेते आम्हाला बदनाम करत आहेत. ती सोडून गेली आम्हाला. आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल दिशाच्या आईवडिलांनी केलेला आहे.’

विधानसभेत राडा: AU नेमकं कोण, स्वत: रिया चक्रवर्तीने काय म्हटलेलं?

‘जे दावे केले तसं काही झालं नाही. माझ्या मुलीला विनाकारण बदनाम केलं जातं. सर्व सत्य माहिती आम्ही पोलिसांना दिलेली आहे. बदनामी होत राहिली, तर आम्ही जगणार नाही. आम्ही जिवाचं बरं वाईट केलं, तर जे नेते हे मुद्दे उपस्थित करतात किंवा संबंधित सहकारी जबाबदार राहतील. मी पुन्हा एकदा विनंती करते की, कुणालाही बदनाम करू नका, असं दिशाच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे,’ असंही अजित पवार म्हणाले.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अजित पवारांनी काय केली मागणी?

अजित पवार म्हणाले, ‘ते (दिशा सालियनचे आईवडिल) राष्ट्रपतींनाही भेटले होते. आईवडिल पोटतिडकीने सांगताहेत. तिने आत्महत्या केलीये, असं सीबीआयकडून आलंय. ही चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षाने हा विषय काढला, मग पूजा चव्हाणचीही चौकशी करा. जसं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, तसं त्यावेळी मी होतो. आम्हालाही थोडा बहुत अधिकार होता. त्यासंदर्भात आम्हीपण सांगत होतो की याची चौकशी झाली पाहिजे.’

‘फक्त आदित्य ठाकरेंचंच नाव का घेतात?’, नितेश राणेंनी केली मोठी मागणी

‘हेच मान्यवर विरोधी पक्षात होते, त्यावेळी कशापद्धतीने सभागृह बंद पाडण्याचा कार्यक्रम झाला. मग चौकशी करायचं झालं, तर सगळ्यांच्या चौकशा कराव्या लागतील. त्यात चौकशी बंद झालेली असली, तरी रिओपन करता येते. महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे की, कारण नसताना यात राजकारण करू नका,” असं आवाहन अजित पवारांनी केलं.

अजित पवारांच्या भूमिकेनंतर फडणवीस काय बोलले?

“अजित पवार जे बोलले, ते बातम्यांच्या आधारावर बोलले. मूळात दिशा सालियन केस कधीच सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंह राजपूत केस सीबीआयकडे गेलेली आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयला ज्यावेळी विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ही केस आमच्याकडे नाही. सीबीआयकडे कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही. मी आश्वस्त करू इच्छितो की, राजकीय अभिनिवेश न ठेवता, यासंदर्भात जे पुरावे मांडले जाताहेत, त्या पुराव्या आधारावर निष्पक्षपणे चौकशी केली जाईल,’ असं फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp