ADVERTISEMENT
गुजरातमधून एक चक्रावून टाकणारं प्रकरण समोर येतं आहे. इथे एका प्रियकराने लग्न केलेल्या प्रेयसीला परत मिळविण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.
या प्रियकारने याचिकेतून प्रेयसीची कस्टडी परत आपल्याकडे द्यावी अशी मागणी केली. याला आधार म्हणून लिव-इनचे अॅग्रीमेंट दाखवले.
याचिका दाखल करणारा प्रियकर बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
या प्रियकराचे म्हणणे आहे की, त्याला नात्यात कायम राहायचं असल्याने प्रेयसीची कस्टडी द्यावी.
प्रियकर म्हणाला की, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्या मर्जीविरोधात लग्न केलं आहे आणि ती पतीसोबतही राहत नाही.
पण सुनावणीदरम्यान, संबंधित तरुणीने पतीला घटस्फोट दिला नसल्याचे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
तसंच यासाठी लिव-इनच्या अॅग्रिमेंटचा आधार घेऊन याचिका दाखल करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
यासोबतच कोर्टाने याचिका दाखल करणाऱ्या युवकाला ५ हजार दंडही ठोठवला.
ADVERTISEMENT