नाशिकच्या रूग्णालयात Oxygen ची गळती, 22 जणांचा मृत्यू

मुंबई तक

• 09:24 AM • 21 Apr 2021

नाशिकच्या झाकिर हुसैन रूगणालयात ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीही 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या दुर्घटनेनंतर या परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचं पथक आणि पोलीसही दाखल झाले आहेत. नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात […]

Mumbaitak
follow google news

नाशिकच्या झाकिर हुसैन रूगणालयात ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीही 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या दुर्घटनेनंतर या परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचं पथक आणि पोलीसही दाखल झाले आहेत. नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

धक्कादायक! नागपूरच्या Covid Care सेंटरमधे ऑक्सिजन संपल्याने चार रूग्णांचा मृत्यू

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्याने आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. या संदर्भात सरकारलाही माहिती कळवण्यात आली आहे.

ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्याने आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

एकीकडे महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात मदत करावी म्हणून वारंवार मागणी केली जाते आहे अशात आता ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे. नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. डॉ. झाकिर हुसैन या रूग्णालयात टँकची गळती आता रोखण्यात आली आहे. मात्र या रूग्णालयात एकूण 150 पेक्षा जास्त रूग्ण हे ऑक्सिजनवर होते तर 15 रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. यापैकी आता 22 रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

हे सरकार निष्काळजीपणा दाखवून आणखी किती बळी घेणार असा प्रश्न आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच नाशिकच्या रूग्णालयात झालेला ऑक्सिजन गळतीचा प्रकार भीषण आहे त्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली आहे असंही प्रविण दरेकर यांनी सांगितलं.

    follow whatsapp