भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या काही महिन्यांपासून सातत्याने येत होत्या. सानिया आणि शोएबचा अधिकृत घटस्फोट झाल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया सातत्याने करत होता. मात्र, या प्रकरणी सानिया आणि शोएबकडून अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही. नुकताच सानिया आणि शोएबचा एक नवीन टॉक शो आला आहे. ज्याने या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. पण यातही एक गोष्ट होती ती म्हणजे आतापर्यंत शोएबने ‘द मिर्झा मलिक शो’ या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला होता. सानियाने याबाबत कोणताही प्रोमो शेअर केलेला नाही. यावर पाकिस्तानी माध्यमांनीही अनेक गोष्टी केल्या.
ADVERTISEMENT
सानियानं शेअर केला शोचा प्रोमो
पण आता पहिल्यांदाच सानियाने या कार्यक्रमाचा प्रोमो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच सानियाने उर्वरित गोष्टीही जवळपास संपुष्टात आणल्या आहेत. सानिया आणि शोएबच्या या कार्यक्रमाचे काही एपिसोड आले आहेत. हा कार्यक्रम फक्त पाकिस्तानी वाहिनीवर प्रसारित केला जात आहे.
पाच महिने डेटिंग केल्यानंतर सानिया आणि शोएबने 2010 मध्ये लग्न केले होते. त्यांना 30 ऑक्टोबर 2018 रोजी मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी इझान मिर्झा मलिक असे ठेवले. शोएब मलिकसोबतच्या लग्नाआधी सानिया मिर्झाने तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झाशी एंगेजमेंट केली होती. पण काही कारणास्तव सोहराब-सानियाची एंगेजमेंट तुटली.
अफेयरबाबत शोएब आणि आयेशा काय म्हणाले?
या संपूर्ण प्रकरणावर शोएब मलिकचं म्हणणं नुकतंच समोर आलं आहे. त्याने एका न्यूज पोर्टलला सांगितले की, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे आणि ती दोघांवर सोडली पाहिजे. त्याचवेळी शोएबने सानियाची फसवणूक केल्याचे मीडियामध्ये बोलले जात होते. यासह पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर हिच्यासोबत शोएबचे अफेअर आहे, अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. यासोबतच शोएब आणि आयशाचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. यावर आयशाने स्वतः सांगितले की, हे फक्त एका जाहिरातीसाठी काढलेले फोटो आहेत. अफेअरच्या चर्चेत तथ्य नाही.
ADVERTISEMENT