‘पंचायत’ची शुटिंग फुलेरा नाही, तर मध्य प्रदेशातील ‘या’ गावात झालीये; पहा फोटो

मुंबई तक

• 09:40 AM • 25 May 2022

सध्या वेब सीरिजमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती ‘पंचायत-२’ची (Panchayat 2). ही वेब सीरिज प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली ही वेब सीरिज प्रेक्षकांना पोट धरून हसायलाही लावते आणि एका टप्प्यावर भावनिकही करते. पंचायत २ वेब सीरिजची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, त्यातील पात्र आणि संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेता जितेंद्र […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सध्या वेब सीरिजमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती ‘पंचायत-२’ची (Panchayat 2). ही वेब सीरिज प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली ही वेब सीरिज प्रेक्षकांना पोट धरून हसायलाही लावते आणि एका टप्प्यावर भावनिकही करते.

पंचायत २ वेब सीरिजची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, त्यातील पात्र आणि संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेता जितेंद्र कुमार (सचिव जी), नीना गुप्ता (मंजू देवी), रघुबीर यादव (प्रधान जी), दुर्गेश कुमार (वनराकस) आणि फैसल मलिक (प्रल्हाद पांडे) यांनी कमालीच्या भूमिका रंगवल्या आहेत.पंचायत वेब सीरिजची ही कथा उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील फुलेरा ग्राम पंचायतीचे प्रधान, सचिव आणि इतर पात्रांच्याभोवती फिरते. रीलमध्ये फुलेरा दिसत असलं, तरी रिअलमध्ये शुटिंग करण्यात आलेलं हे गाव वेगळंच आहे.

पंचायत वेब सीरिजची ही कथा उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील फुलेरा ग्राम पंचायतीचे प्रधान, सचिव आणि इतर पात्रांच्याभोवती फिरते. रीलमध्ये फुलेरा दिसत असलं, तरी रिअलमध्ये शुटिंग करण्यात आलेलं हे गाव वेगळंच आहे.

पंचायत (panchayat web series) वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाची शुटिंग झालीये, ती मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील महोडिया गावात.

हे गाव सीहोर जिल्ह्याच्या ठिकाणाहून काही किलोमीटर अंतरावरच आहे. महोडिया गावात सरपंच (प्रधान) महिलाच असून, त्यांचं नाव राजकुमारी सिंह सिसोदिया आहे. त्यांच्या पतीचं नाव लाल सिंह आहे. पंचायतीचे सचिव हरिश जोशी असून, प्रताप सिसोदिया सहाय्यक आहेत.

पंचायत वेब सीरिजची शुटिंग २०१९ आणि २०२१ मध्ये करण्यात आली. महोडिया गावात पंचायत वेब सीरिजच्या पहिल्या भागाचं २०१९ मध्ये शुटिंग करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या भागाचं शुटिंग २०२१ मध्ये पार पडलं.

या शुटिंगची एक्सक्लुसिव्ह छायाचित्रे आज तकने प्रसिद्ध केली आहेत. यातील एका फोटोत रघुबीर यादव अर्थात प्रधान जी, उप प्रधान (फैसल मलिक) आणि सचिव जीचे सहायक चंदन रॉय हे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत दिसत आहे.

पंचायत-२ अनेकांना भावलेली आणि चर्चेत राहिलेली नवराकस (दुर्गेश कुमार) आणि त्यांची पडद्यावरील पत्नी क्रांती देवी (सुनीता राजवर) यांचा शुटिंग दरम्यानचं एक छायाचित्र आहे.

आणखी एका छायाचित्रात रस्त्यावरील चित्रिकरण करताना दिसत आहे. यात पोलिसांच्या भूमिकेत असलेले सहायक कलाकारही दिसत आहेत.

वेब सीरिजच्या शुटिंगसाठीची टीम सीहोर या जिल्ह्याच्या ठिकाणी थांबली होती. मुख्य कलाकारांसह सहयोगी कलाकारांना त्यांच्या शुटिंगप्रमाणे गावात नेलं जायचं आणि परत जिल्ह्याच्या ठिकाणी आणलं जायचं. त्याचबरोबर शुटिंगसाठी लागणार साहित्य भोपाळ, इंदौर आणि सीहोर मागवलं जायचं.

    follow whatsapp