तो हा विठ्ठल सुंदर! माऊलीचं डोळ्यात साठवावं असं रुप

मुंबई तक

• 05:47 PM • 22 Aug 2021

देव भक्तीचा भुकेला असतो, असं म्हणतात. त्यामुळे भाविक वेगवेगळ्या मार्गाने भक्तीसेवा करत असतात. राखी पौर्णिमेनिमित्त रविवारी (२२ ऑगस्ट) श्री विठ्ठलाला सोन्याची राखी बांधण्यात आली. दुसरीकडे रुक्मिणी मातेलाही पारंपरिक दागिन्यांचा साज घालण्यात आल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत होतं. या दिवसाचे औचित्य साधून पुण्यातील भाविकाने विठू माऊलीला दोन तोळे सोन्याची राखी अर्पण केली. ज्ञानेश्वर रोहिदास भुरूक […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

देव भक्तीचा भुकेला असतो, असं म्हणतात. त्यामुळे भाविक वेगवेगळ्या मार्गाने भक्तीसेवा करत असतात.

राखी पौर्णिमेनिमित्त रविवारी (२२ ऑगस्ट) श्री विठ्ठलाला सोन्याची राखी बांधण्यात आली.

दुसरीकडे रुक्मिणी मातेलाही पारंपरिक दागिन्यांचा साज घालण्यात आल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत होतं.

या दिवसाचे औचित्य साधून पुण्यातील भाविकाने विठू माऊलीला दोन तोळे सोन्याची राखी अर्पण केली.

ज्ञानेश्वर रोहिदास भुरूक व विक्रम रोहिदास भुरूक (रा.धायरी, जि. पुणे) यांनी आई इंदुबाई भुरूक यांच्या नावे विठ्ठलास सोन्याची राखी अर्पण केली.

भाविकाकडून विठ्ठलाला अर्पण केलेली ही राखी दोन तोळे सोन्याची आहे.

राखी पौर्णिमेनिमित्त विठू माऊली आणि रुख्मिणी मातेला वस्त्रालंकार नेसवण्यात आल्यानं दोघांची रुपं डोळ्यात साठवून घ्यावी अशीच दिसतं होती.

    follow whatsapp