औरंगाबाद येथील जाहीर सभेत बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असा आरोप राज यांनी पुन्हा केला. या विधानावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज यांना फटकारलं आहे.
ADVERTISEMENT
“राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्याविरुद्ध बोलल्याशिवाय राज यांना कव्हरेज मिळत नाही म्हणून ते टीका करतात. उद्या जर ते काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षावर बोलले तर लोकं त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणूनच ते शरद पवारांवर टीका करतात. परंतू राज यांच्या विधानाला आता महाराष्ट्रातील लोकं किंमत देत नाही”, सांगली जिल्ह्यातील ताकारी येथे एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.
राज ठाकरेंचं भाषण राज्याची शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक, AAP कडून कारवाईची मागणी
यावेळी जयंत पाटील यांनी भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीबाबतही भाष्य केलं. “भाजप-मनसे युती अद्याप झालेली नाही. भाजपनेही मनसेला अजुन कोणतंही स्थान दिलेलं नाही. परंतू केवळ ईडीच्या दबावाखाली राज भाजपचं स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत.” एकीकडे राज यांनी हिंदूबद्दल बोलणं आणि ओवैसी यांनी मुस्लीम मतांबद्दल बोलणं हे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा डाव आहे. परंतू दोन्ही समाजातील लोकं आता हुशार झाली आहेत. मतांच्या राजकारणासाठी हा डाव सुरु असल्याचं त्यांना आता कळतंय, असंही पाटील यांनी सांगितलं.
‘बाबरी पडली तेव्हा राज कुठे होते?’; उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर
ADVERTISEMENT