Pimpri Chinchwad Crime News : लिफ्टमधल्या रक्ताच्या डागांमुळे हत्येचा कट उघड, प्रेयसीनेच केला घात

Pimpri Chinchwad CCTC video: मारहाणीत जखमी झालेला बालाजी वेदनेने अक्षरश: तडफडत होता. रक्ताने माखलेल्या बालाजीला रुग्णालयात  नेतानाचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. सीसीटीव्हीवरून हे स्पष्ट होतंय की, आरोपींनी हा अपघात असल्याचा डाव रचला.

Mumbai Tak

मुंबई तक

23 Jan 2025 (अपडेटेड: 23 Jan 2025, 06:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचा मोठा कट उघड

point

प्रेयसीनेच मित्रांच्या मदतीने प्रियकराला संपवलं

point

लिफ्टमध्ये रक्ताचे डाग दिसले, पोलिसांचा संशय वाढला

Pimpri Chinchwad Crime News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीने आपल्या मित्रांच्या मदतीने थेट आपल्या प्रियकराचीच  हत्या केली आहे. प्रेयसीने आपल्या गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला रुग्णालयात दाखल केलं. हत्येला एक अपघात  दाखवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. पण, पोलीस तपासात सर्व काही उघड झालं. बालाजी लांडे या प्रकरणातील मृत व्यक्तिचं नाव आहे. क्राइम ब्रांचने सहापैकी तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या प्रेयसीचं नाव रेखा विश्वंभर भटनासे असं आहे. प्रेयसीची अल्पवयीन मुलगीही हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असून, तिलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. बालाजीला रुग्णालयात नेत असतानाचे  सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेयसी रेखा आणि तिचा बॉयफ्रेंड बालाजीमध्ये नेहमीच वाद होत असत. बालाजी रेखाला मानसिक त्रास देत होता. या समस्येला कंटाळून रेखाने बालाजीला मारण्याचा प्लॅन आखला. रेखा राहत असलेल्या घरात बालाजीला बोलावण्यात आलं. दिनेश उपाडे, आदित्य शिंदे आणि इतर तिघांनी बालाजीच्या पायावर आणि डोक्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या बालाजीला रिक्षाने महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आलं.

हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिकला ज्या स्कॉर्पिओने CID ऑफिसला सोडलं, ती 30 तारखेला बीडमधूनच निघाली? CCTV ने खळबळ

मारहाणीत जखमी झालेला बालाजी वेदनेने अक्षरश: तडफडत होता. रक्ताने माखलेल्या बालाजीला रुग्णालयात  नेतानाचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. सीसीटीव्हीवरून हे स्पष्ट होतंय की, आरोपींनी हा अपघात असल्याचा डाव रचला आणि दिशाभूल  करण्यासाठी रुग्णालयात खोटी नावं दिली. दरम्यान, उपचार मिळण्यापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी सीसीटीव्हीही तपासले. ज्या बालाजीची हत्या झाली होती, त्याला रिक्षातून आणलं जात होतं. तीच रिक्षा चिखलीच्या दुर्वांकुर सोसायटीमधून निघालेली दिसली.

पोलीस तिथे पोहोचले असता, लिफ्टमध्ये काही रक्ताचे डागही आढळले. पोलिसांना घातपाताचा संशय आला. खोली क्रमांक 303 वर पोहोचताच, आरोपी रेखाची 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी दिसली. तिला जेव्हा बालाजीचा फोटो दाखवण्यात आला आणि ओळख विचारली, तेव्हा अल्पवयीन मुलीने संपूर्ण घटना सांगितली. 

हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिक कराडची माघार, खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेतला, कारण काय?

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक बीडला रवाना झालं आहे. मानसिक ताणामुळे प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची कबुली प्रेयसीने पोलिसांना दिली आहे. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे.

    follow whatsapp