राजकीय पक्षांना राज्यातील इतर महापालिकांबरोबरच पुणे महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील मेट्रोसह विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते केलं जाणार असून, याची सुरूवात महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाने झाली.
ADVERTISEMENT
पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं.
पुतळा अनावरण सोहळा पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
मोदींचा पुणे दौरा: वाहतुकीच्या मार्गांमध्ये महत्वाचे बदल,पुणेकरांनो या रस्त्याने प्रवास टाळा
पंतप्रधान मोदींचा उर्वरित दौरा
– सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
– पंतप्रधान मोदी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करणार आहे. त्यानंतर आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत.
– MIT शैक्षणिक संकुलात मोदींची जाहीर सभा होणार आहे.
– दुपारी १२ वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत.
– मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मोदींच्या हस्ते केला जाणार आहे.
– बाणेर येथे १०० ई-बस आणि ई-बस डेपोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार.
– पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
– दुपारी १:४५ वाजता पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत.
ADVERTISEMENT