सकाळी-सकाळीच पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

मुंबई तक

• 07:15 AM • 01 Mar 2021

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत खुद्द मोदींनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळीच एम्स रुग्णालयात जाऊन मोदींनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. यासोबतच […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत खुद्द मोदींनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळीच एम्स रुग्णालयात जाऊन मोदींनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी लोकांना देखील घेण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

याबाबत खुद्द पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ‘मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड-19 लसीचा पहिला डोस घेतला. ही गोष्ट कौतुकास्पद आहे की, आमच्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी कोरोनाविरुद्धच्या जागतिक लढाईला मजबूत करण्यासाठी त्वरित काम सुरु केलं होतं. जे लस घेण्यास पात्र आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो. चला, एकत्र येऊन भारत कोरोनोमुक्त करुयात!’

पंतप्रधान मोदींनी कोणती लस घेतली? (PM Modi Which vaccine took?)

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत बायोटेकची कोवॅक्सिन COVAXIN (Bharat BioTech) लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. ज्याला ज्याला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

ही बातमी देखील पाहा: आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा, मुंबईत या ठिकाणी मिळेल तुम्हाला लस

पंतप्रधान मोदींनी कुणी टोचली लस? (Who gave it Vaccine to PM Modi?)

राजधानी दिल्लीतील एम्स या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या पुद्द्चेरी येथील रहिवासी असलेल्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. यावेळी लस टोचत असतानाचा फोटो देखील पंतप्रधान मोदींनी ट्विट केला आहे. कोरोनाची ही लस सुरक्षित असून आपण देखील ती घ्यायला हवी असं आवाहन यावेळी मोदींनी केलं आहे.

पाहा पंतप्रधान मोदींनी लस घेतला तो क्षण (VIDEO)

पंतप्रधान मोदी कोरोनावरील लस का घेत नाहीत? असा सवाल आतापर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार विचारला जात होता. मात्र, आता पंतप्रधान मोदींनी कोवॅक्सिनची पहिली लस घेऊन याबाबत अधिक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु

केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून राबवण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील आजारी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या टप्प्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लसीकरण राबवण्यात येणार आहे. मुंबई शहरातील जी खासगी रुग्णालयं जन आरोग्य योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा रुग्णालयांना सदर लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयात लसीकरण निशुल्क: असून खासगी रुग्णालयात प्रत्येक डोससाठी २५० रुपये भरावे लागणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात कोणाकोणाला दिली जाणार लस?, काय आहे नियम?

  • 60 वर्षांवरील नागरिकांना दिली जाणार लस

  • 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना लस देणार

  • गंभीर आजार नेमके कोणते याची देखील सरकारकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • गंभीर आजार असणाऱ्यांना मान्यता प्राप्त डॉक्टरांचं प्रमाणपत्र असणं गरजेचं

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केलं मोदींचं कौतुक

शिवसेनेच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदींनी कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर त्यांचं कौतुक केलं आहे. याविषयी त्यांनी ट्विट केलं आहे. ‘हे पाहून बरं वाटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोवॅक्सिन घेतली आहे. यामुळे लसीबाबत ज्या काही शंका आहेत त्या दूर होण्यास मदत होईल आणि ज्या लोकांच्या मनात लस घेण्याबाबत संकोच आहे तो देखील निघून जाईल. अधिकाधिक लोकांना लसी देण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला आज प्रारंभ झाला आहे. भारत सुरक्षित रहावे अशी मी प्रार्थना करते.’

दुसऱ्या टप्प्यात 27 कोटी लोकांना दिली जाणार लस

लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात जवळजवळ 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. 12 हजाराहून जास्त सरकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याशिवाय देशातील अनेक खासगी रुग्णालयात जाऊन देखील पात्र नागरिकांना लस घेता येणार आहे.

    follow whatsapp