पाच राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
‘काँग्रेसची कार्यशैली आणि विचारधारा सांप्रदायिकता, जातिवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार हीच आहे. हेच देशाच्या मुख्य प्रवाहात राहणार असेल, तर देशाचं किती नुकसान होईल,’ असं मोदी म्हणाले.
मोदींनी संसदेत विरोधकांवर केलेली तुफान टीका
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत केलेल्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर बोलताना पंतप्रधान मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षावर तुफान टीका केली होती.
यावेळी पंतप्रधानांच्या निशाण्यावर विशेषत: काँग्रेस पक्षच होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकार आणि दिल्ली सरकारची वृत्ती, शीख नरसंहार, कुटुंबवाद, घराणेशाही, काश्मिरी पंडित या सगळ्या मुद्द्यांवरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.
1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत-मोदी
यामुळे पंतप्रधान मोदी हे आजच्या मुलाखतीत नेमकं काय बोलणार आणि अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पाच राज्यातील निवडणुकांवर त्याचे काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT