आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कार्यक्रमात व्हीडिओ संदेशाद्वारे देशाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज अवघा देश वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहतो आहे. सरदार पटेल हे फक्त इतिहासात नाहीत तर त्यांचं स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनामनात आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आज राष्ट्रीय एकता दिवस आहे त्यानिमित्त सगळ्या देशवासीयांनाही मी शुभेच्छा देतो असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या नवनिर्माणाचा प्रयत्न करत आहेत. सरदार पटेल यांचा देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा एखाद्या शरीराकडे पाहण्याचा होता. त्यांच्यासाठी भारताचा अर्थ विकासनशील भारत होता. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार हे त्यांचं स्वप्न होतं असंही मोदी म्हणाले.
आणखी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘सरदार पटेल हे कायम हाच विचार करत होते की भारत सशक्त असला पाहिजे, सर्वसमावेश असला पाहिजे. संवेदनशील आणि सतर्कही असला पाहिजे. विनम्र आणि विकसित असला पाहिजे. स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान सरदार पटेल यांचं होतं. त्यांच्या प्रेरणामळेच भारत आज अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा नायकाला अवघा देश आदरांजली वाहतो आहे.’
सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी आज भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. भारताचे गृहमंत्री अमित शाह हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोममध्ये आहेत त्यामुळे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हे अमित शाह होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोमहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशवासीयांशी संवाद साधला आणि या कार्यक्रमात सहभाग घेतला.
अमित शाह काय म्हणाले?
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सरदार पटेल यांनी जे प्रयत्न केले तसंच स्वतंत्र भारतासाठी जे योगदान दिलं ते विस्मरणात गेलं होतं ही बाब दुर्दैवी आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरही त्यांच्या योगदानाचा योग्य तो आदर केला गेला नाही. त्यांना भारतरत्नही दिलं गेलं नाही. आता मात्र ही सगळी परिस्थिती बदलली आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT