PMO Fake Official Arrested :
ADVERTISEMENT
श्रीनगर : पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) उच्चाधिकारी असल्याचं सांगून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेला दोनवेळा चकवा देणाऱ्या किरण पटेल (Kiran Patel) याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण पटेल याच्यावर झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही आणि जम्मू-काश्मीरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (PMO Fake Official: Kiran Patel was arrested by the authorities from a hotel in Srinagar)
किरण पटेल याने जम्मू-काश्मीरमधील उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि नियंत्रण रेषेजवळील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्याचा आरोप आहे. किरण पटेलला 3 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्याने स्वत:ची ओळख केंद्रात ‘अतिरिक्त सचिव’ म्हणून करून दिली होती आणि दावा केला की त्याला सरकारने दक्षिण काश्मीरमधील सफरचंदच्या बागांसाठी खरेदीदार ओळखण्याचे आदेश दिले होते.
कोण आहे किरण पटेल?
किरण पटेल गुजरातचा रहिवासी आहे. आरोपीचे व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट आहे. त्याच्या ट्विटर प्रोफाइलनुसार, त्याने व्हर्जिनियामधील कॉमनवेल्थ विद्यापीठातून पीएचडी आणि आयआयएम त्रिचीमधून एमबीए केले आहे. आरोपीने ट्विटरवर विचारवंत, रणनीतीकार, विश्लेषक आणि प्रचार व्यवस्थापक असल्याचं सांगितलं आहे.
Baramati Agro : राम शिंदेंचे प्रयत्न फळाला; रोहित पवारांना मोठा धक्का
श्रीनगरमधील निशात पोलिस स्टेशनमध्ये दाखल एफआयआरनुसार, किरण पटेल दोन वेळा काश्मीर खोऱ्यातील विविध भागात अॅक्टिव्हिटी केल्या. त्याने सरकारी आदरातिथ्य, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) आणि आलिशान हॉटेलमधील खोलीचाही मनमुराद आनंद घेतला. त्याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक मिळाल्याचे अनेक व्हिडिओ देखील पोस्ट केले होते.
आंदोलक शेतकऱ्यांना दिलासा! CM एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मात्र 2 मार्च रोजी पटेल तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये आला आणि विमानतळावर उतरला, त्यावेळी सीआयडी अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. कारण कोणत्याही VIP मुव्हमेंटची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या ताब्यातून बनावट ओळखपत्रं जप्त केली. पटेल यांच्याकडून 10 बनावट व्हिजिटिंग कार्ड जप्त करण्यात आले असून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
त्यानंतर पटेल यांच्यावर २ मार्च रोजी फसवणूक आणि बनावट बनावटीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पटेल यांचे वकील रेहान गोहर यांनी दावा केला आहे की, किरण पटेलसोबत आणखी एक व्यक्ती होता. गोहर यांनी सांगितलं की, पोलिसांनी दंडाधिकार्यांसमोर 16A अंतर्गत किरण पटेलचा जबाब नोंदवला, पण दुसर्या व्यक्तीला सोडण्यात आले. तर किरण पटेलने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ADVERTISEMENT