वनमंत्री संजय राठोड यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन हे पोहरादेवीच्या महंतांसह सात जणांना भोवलं आहे. याचं कारण पोहरादेवीच्या महंतासह सात जण कोरोना पॉझटिव्ह झाले आहेत. परवाच संजय राठोड यांनी या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंचा जमाव या ठिकाणी जमला होता. त्यावेळीच कोरोनाची भीतीही व्यक्त केली जात होती. जी भीती खरी ठरली आहे. पोहरादेवीच्या एका महंतालाच कोरोना झाला आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारचा पुण्यात मृत्यू झाला. ७ फेब्रुवारीला तिने पुण्यात वास्तव्य करत असलेल्या इमारतीवरून उडी मारली. पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिप्समधला एक आवाज हा वन मंत्री संजय राठोड यांचा असून त्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने सुरु केली. हे सगळं प्रकरण घडल्यानंतर संजय राठोडही नॉट रिचेबल होते. जे थेट परवा पोहरादेवी या ठिकाणी आले.
खरंतर संजय राठोड हे पोहरादेवी या ठिकाणी येणार हे निश्चित झालं असतानाच जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावली होती. तरीही हजारो बंजारा बांधव हे पोहरादेवीला पोहचले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार ही भीती होतीच. आता पोहरादेवी या ठिकाणी एकूण आठजण पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी एक महंत आहे. २२ तारखेला म्हणजेच संजय राठोड यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज म्हणजेच २५ तारखेला चाचणी करण्यात आली ज्यामध्ये आठजण पॉझिटिव्ह निघाले.
ADVERTISEMENT