लसीकरणाचे अधिकारी बनून घरात शिरुन दरोडा टाकलेल्या टोळीला अकोला पोलिसांनी ७२ तासांत अटक केली आहे. अकोल्याच्या अकोट शहरात हार्डवेअरचा धंदा करणाऱ्या सेजपाल या व्यापाऱ्याच्या घरी दरोडा पडला होता. चोरट्यांनी त्यावेळी घरात असलेल्या दोन वृद्धांना आणि एका लहान मुलीला बांधून खोलीत कोंडून ठेवलं होतं.
ADVERTISEMENT
यानंतर घरातला एक मोबाईल आणि ३०-४० हजारांची रोखरक्कम घेऊन त्यांनी पोबारा केला. या प्रकारानंतर अकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. यानंतर ३ महिला आणि ३ पुरुषांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला व्यापारी सेजपाल यांच्याकडे काम करत होती. एक वर्षभरापूर्वी तिने घरकाम सोडल्यानंतर घराची रेकी करुन ठेवली होती. कोण केव्हा बाहेर जातं, कोणत्या व्यक्ती नेहमी घराबाहेर असतात याची खडान खडा माहिती आरोपींकडे होती. याच्याच आधारावर लसीकरणाचे अधिकारी बनून आरोपींनी घरात प्रवेश केला.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा समजला होता. यानंतर अकोला पोलिसांच्या पथकाने वेळेत तपासाची चक्र हलवत आरोपींना गजाआड केलं.
ADVERTISEMENT