अमरावती : पोलीसानेच माझ्या बायकोला पळवून नेलं, इंजिनीअरने लावलेल्या आरोपांमुळे खळबळ

मुंबई तक

• 01:39 PM • 24 Feb 2022

अमरावतीमधल्या एका इंजिनीअर तरुणाने पोलीस यंत्रणेवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार इंजिनीअर तरुणाचा आपल्या बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा पुनर्विवाह केला होता. मात्र दुसरं लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच पोलीस ठाणेदार अमूल बच्छाव यांनी आपल्या पत्नीला पळवून नेल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे. अमुल बच्छाव हे अमरावती येथील येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत […]

Mumbaitak
follow google news

अमरावतीमधल्या एका इंजिनीअर तरुणाने पोलीस यंत्रणेवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार इंजिनीअर तरुणाचा आपल्या बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा पुनर्विवाह केला होता. मात्र दुसरं लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच पोलीस ठाणेदार अमूल बच्छाव यांनी आपल्या पत्नीला पळवून नेल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे.

हे वाचलं का?

अमुल बच्छाव हे अमरावती येथील येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदाराने केलेल्या आरोपामुळे अमरावती पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमूल बच्छाव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बऱ्याच महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असून आपल्या पत्नीलाही पळवून नेल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये तक्रारदार तरुणाने बच्छाव यांच्याविरुद्ध आपल्या पत्नीसोबत लगट करतो म्हणून तक्रार दाखल केली होती. यानंतर १० डिसेंबर रोजी बुलढाणा येथे आपल्याला बच्छाव यांच्या नावाचा संदर्भ देऊन एका व्यक्तीने धमकावल्याचंही या तरुणाने सांगितलं. आपल्या पदाचा गैरवापर करुन बच्छाव याने पत्नीसोबत शरिरसंबंध प्रस्थापित केल्यामुळे या तरुणाने घटस्फोट घेतला होता.

चंद्रपूरमध्ये नातवाने केली आजोबांची हत्या, घरात मृतदेह पुरल्याचं 45 दिवसांनी उघड

परंतू कुटुंब आणि मुलांच्या काळजीपोटी या तरुणाने सर्वकाही विसरुन आपल्याच घटस्फोटीत पत्नीशी पुन्हा विवाह केला. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी या तरुणाचं दुसऱ्यांदा लग्न झाल्यानंतर २२ नोव्हेंबरपासून आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार या तरुणाने केली आहे. बच्छाव याच्यापासून आपल्या कुटुंबाला धोका असल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या आरोपसत्रानंतर बच्छाव यांची अमरावती पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस अधिक्षक बारगड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार

    follow whatsapp