बारामती : I am Sorry Mom, रक्ताने अखेरचा संदेश लिहीत पोलीस शिपायाची आत्महत्या

मुंबई तक

• 01:33 PM • 22 Jun 2021

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. रज्जाक महंमद मणेरी असं या पोलीस शिपायाचं नाव असून त्याने रक्ताने फरशीवर I am Sorry Mom असा संदेश लिहून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. […]

Mumbaitak
follow google news

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. रज्जाक महंमद मणेरी असं या पोलीस शिपायाचं नाव असून त्याने रक्ताने फरशीवर I am Sorry Mom असा संदेश लिहून गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

हे वाचलं का?

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. रजाक सोमवारपासून आपल्या घरच्यांचे फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी किकवी येथील त्याचं घर गाठलं. यावेळी घराचा दरवाडा उघडत नसल्यामुळे बांबुच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता आत रज्जाकचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

रज्जाकचे वडीलही पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. तर त्याचा भाऊही वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. रज्जाक हा आपल्या कामात अतिशय तरबेज होता, परंतू त्याने ज्या पद्धतीने स्वतःचं जीवन संपवलं ते पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. राजगड पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

    follow whatsapp