Nagpur : ‘हॅलो, फडणवीसांच्या घरात बॉम्ब’;धमकीचं ‘लाईट’ कारण आलं समोर

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 02:40 PM)

राज्याचे उप मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नागपूर निवासस्थानी बॉम्ब पेरल्याची (bomb threat) फोनवरून धमकी मिळाली होती. मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती.

'हॅलो, फडणवीसांच्या घरात बॉम्ब'; धमकीचं 'लाईट' कारण आलं समोर

'हॅलो, फडणवीसांच्या घरात बॉम्ब'; धमकीचं 'लाईट' कारण आलं समोर

follow google news

A bomb threat received Devendra Fadnavis house : राज्याचे उप मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नागपूर निवासस्थानी बॉम्ब पेरल्याची (bomb threat) फोनवरून धमकी मिळाली होती. मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती. या कॉलनंतर सर्व यंत्रणा मध्यरात्री खडबडून जागी झाली होती. बॉम्ब स्कॉडपासून डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र त्यांना बॉम्बसदृष्य वस्तू सापडली नव्हती. त्यानंतर आता हा फेक कॉल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आले आहे. या आरोपीने या घटनाक्रमाबाबत दिलेली कबुली एकूण पोलिसांनाच धक्का बसला आहे.(power cut issue a man give bomb threat to devendra fadnavis house nagpur police)

हे वाचलं का?

घटनाक्रम काय?

नागपूरच्या पोलिस (Nagpur Police) कंट्रोल रुमला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास एक फोन केला होता.या फोन कॉलमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) घराबाहेर बॉम्ब प्लांट (bomb threat)केल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती दिल्यानंतर लगेचच फोन कट करण्यात आला होता. या माहितीनंतर घटनास्थळी बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.यासोबतच पोलिसांची एक टीम देवेंद्र फडणवीसांच्या घरात पोहोचली होती. यावेळी तिन्ही यंत्रणांनी कसून तपास केला होता. साधारण अनेक तास तपास करून सुद्धा त्यांना बॉम्बसदृष्य वस्तु सापडली नव्हती.त्यामुळे ही खरीखूरी धमकी होती की कोणीतरी मजेसाठी अशी गोष्ट करतंय, अशा संशय पोलिसांना बळावला होता.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे, आदित्य अन् संजय राऊत हाजीर हो! दिल्ली हायकोर्टाचे आदेश

आरोपी ताब्यात

घटनास्थळावरून बॉम्ब सदृष्य वस्तु सापडली नसल्याने पोलिसांना ही निनावी धमकीचा फोन असल्याचा संशय बळावला होता.त्यामुळे पोलिसांनी ज्या नंबरवरून धमकी मिळाली होती, त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. आणि अखेर पोलिसांना या घटनेत यश आले. निनावी फोनद्वारे बॉम्ब असल्याची धमकी देणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी आरोपीला तब्बल 30 किलोमीटर दूर परिसरातून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस कमिश्नर अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान या आरोपीचे नाव अद्याप सार्वजनिक करण्यात आले नाही आहे. दरम्यान हे घटनाक्रम करण्याबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरे, तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर…”; भाजपने वाचली यादी

…म्हणून धमकी दिली

आरोपीच्या परिसरात सतत लाईट जायची. या सततच्या प्रकारामुळे तो संतप्त झाला होता. या संतप्ततेतून त्याने हे कृत्य केल्याची कबूली दिली. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी पोलिसांनी चुकीची माहिती दिली, अशी माहिती त्याने पोलिस चौकशीत दिली आहे.आरोपीचा हा जबाब एकूण पोलिसांना मोठा धक्का बसला होता.

    follow whatsapp