प्रतिक्षा बागडी ठरली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

मुंबई तक

• 04:30 PM • 24 Mar 2023

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी सांगलीचीच प्रतीक्षा बागडी मानकरी ठरली आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटीलला अस्मान दाखवत तिने ही चांदीची गदा जिंकली आहे.

प्रतिक्षा बागडी ठरली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

प्रतिक्षा बागडी ठरली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

follow google news

pratiksha bagadi 1st women maharashtra kesari : सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी सांगलीचीच प्रतीक्षा बागडी (pratiksha bagadi) मानकरी ठरली आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटीलला (vaishanavi patil)अस्मान दाखवत तिने ही चांदीची गदा जिंकली आहे. प्रतिक्षाला चांदीची गदा आणि 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे. तर उपविजेती ठरलेल्या वैष्णवी पाटील हिला 25 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले आहे.(pratiksha bagadi beat vaishanavi patil became 1st women maharashtra kesari)

हे वाचलं का?

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यभरातून विविध वजनी गटासाठी 43 संघ आणि 300 महिला मल्ल या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. यामधून सांगलीची प्रतीक्षा बागडी (pratiksha bagadi) आणि कल्याणची वैष्णवी पाटील (vaishanavi patil) अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्या होत्या. यावेळी 76 किलो वजनी गटात ही कुस्ती खेळली गेली. यामध्ये सांगलीत आयोजित केलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची सांगलीचीच प्रतीक्षा बागडी मानकरी ठरली आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला तिने नमवले आहे.

कामावर पोहोचण्यास उशीर…, ट्रॅफिक पोलिसाची होमगार्डलाच कानशिलात

विशेष म्हणजे सांगलीत आयोजित केलेल्या या पहिल्या वहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अजिंक्य पद पटकावणे सांगलीच्या महिला मल्लांसाठी अतिशय प्रतिष्ठेचे होते. कारण स्पर्धेचे पहिलेच वर्ष आणि ती सांगली जिल्ह्यात आयोजित होती. त्यामुळे सांगलीच्या महिला मल्लावर विशेष जबाबदारी होती. ही जबाबदारी प्रतिक्षा बांगडी उत्कृष्टरीत्या पेलवत सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

शंभूराज देसाईंकडून घेतली पुडी… शिंदे बोलत असताना भरत गोगावलेंनी बघा काय केलं

सांगलीची प्रतीक्षा बांगडी (pratiksha bagadi) पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरलीय. प्रतिक्षाला चांदीची गदा आणि 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे.तर 25 हजार रुपयांचे बक्षीस वैष्णवी पाटील हिला देण्यात आले आहे. कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, माजी महापौर संगीता खोत आणि जयश्री पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.

    follow whatsapp