यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बंदी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे बाळ आणि बाळंतिणीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ADVERTISEMENT
नताशा अविनाश ठोके असं या महिलेचं नाव आहे. प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होत असताना या महिलेची वाटेतच प्रसुती झाली. मिळालेल्या माहितीनुसार, नताशा ही प्रसुतीसाठी आपल्या वडीलांच्या घरी मन्यळी भागात आली होती. रविवारी तिला प्रसुती वेदना चालू झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला धानकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी बाहेर पडले.
बीड: जिवंतपणीच पतीकडून मरणयातना! पत्नीला तब्बल चार वर्षांपासून ठेवलं डांबून, कारण…
परंतू वाटेवरचा रस्ता खड्ड्यांनी खराब झालेला असल्यामुळे नताशाला वाटेत त्रास व्हायला सुरुवात झाली. धानकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होण्याआधीच दोन किलोमीटर अंतरावर नताशाची प्रसुती झाली. परंतू यानंतर अवघ्या काही काळात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच नताशाचाही प्राण गेला.
धुळे : शेतातील झोपडीला आग, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा होरपळून मृत्यू
या घटनेमुळे ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे एका महिलेला आणि तिच्या बाळाला प्राण गमवावे लागल्यामुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT