धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीकेचे बाण चालवले. त्याआधी सोमवारीही त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. याबाबत काँग्रेसकडून प्रतिक्रिया येत आहेत. अशात महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा शेलक्या शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनवू नये असं म्हटलं आहे.
1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत-मोदी
काय म्हणाल्या आहेत यशोमती ठाकूर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या २ दिवसंपासून संसदेत ज्या भाषेत आणि जशा देहबोलीत बोलत आहेत, ते अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा भाषेत अशा देहबोलीसह बोलणं शोभत नाही. या देशाला इतिहास आहे. हा इतिहास तोडण्याची मोडण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदींना संघाच्या शाखेत जे शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे. त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं कुलगुरू होऊ नये.
या देशाचा एक इतिहास आहे आणि संसदेची एक गरीमा आहे. त्यांनी ते सगळं सांभाळावं. जे काही वाईट झालं ते काँग्रेसमुळे झालं आणि जे काही चांगलं झालं ते फक्त मागील ७ वर्षातच झालं असं ते सांगत आहेत. पीएसयू मागील ७ वर्षात विकले गेले, पण त्याआधी ते निर्माण करण्यात आले. त्याबद्दल मोदींना काहीही चांगुलपणा नाही. पंतप्रधान मोदी जे जे बोलत आहेत ते द्वेषापोटी बोलत आहेत. त्यांच्या देहबोलीतून हे दिसून येतं. ते अत्यंत नैराश्यात गेले आहेत. मोदींना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते कितीही खालच्या दर्जावर गेले तरी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ते चालतं. या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करते असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
हृदयनाथ मंगेशकरांना खरंच आकाशवाणीतील नोकरीवरून काढून टाकलेलं का?
नेहरूंना नौटंकी करावी लागली नाही
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना कधीही स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी असले नौटंकी चाळे करावे लागले नाहीत, पंडीत नेहरू हे आंतरराष्ट्रीय नेतेच होते. त्यामुळे त्यांना आपल्या इमेजची चिंता किंवा इमेज बनवण्यासाठी आतासारखी नौटंकी कधी करावी लागली नाही.असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते?
लोकशाही काँग्रेसच्या मेहरबानीमुळे निर्माण झालेली नाही. 1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला त्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत. 1947 ला गर्व करून सांगायला हवं होतं की आमचा भारत ही लोकशाहीची जननी आहे. मात्र ते बोलले नाही. भारतात लोकशाही काँग्रेसने आणलेली नाही. लोकशाही आणि वादविवादाची परंपरा हजारो वर्षांपासून देशात सुरू आहे. काँग्रेसने परिवारवादापुढे कसला विचारच केला नाही.
आज जे लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत त्यांनी जरा विचार करावा की भारतात लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा परिवादी पक्षांचा आहे. ही बाब मान्यच करावी लागेल. एवढंच नाही तर पक्षापेक्षा जेव्हा परिवार मोठा होतो तेव्हा सर्वात पहिली हत्या होते ती टॅलेंटची हे कुणीही विसरता कामा नये. देशाने एक दीर्घ काळ या परिवारवादामुळे खूप भोगलं आहे. देशातल्या सगळ्या पक्षांनी आपला सर्वांगिण विकास केला पाहिजे. भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेस या पक्षाची जबाबदारी सर्वाधिक आहे.
ADVERTISEMENT