PM मोदींनी सादर केलं 6G व्हिजन डॉक्युमेंट, 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या नेमकं काय असतं?

मुंबई तक

• 05:54 AM • 22 Mar 2023

दिल्ली : नुकत्याच आलेल्या 5G स्पीडच्या वापरालाही कंटाळ असला तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. लवकरच भारतात 6G इंटरनेट स्पीड मिळणार आहे. देशात 5G लाँच होण्यास काहीसा उशीर झाला होता. मात्र आता 6G ची तयारी धुमधडाक्यात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (बुधवारी) इंडियाचे 6G व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. यासोबतच त्यांनी 6G […]

Mumbaitak
follow google news

दिल्ली : नुकत्याच आलेल्या 5G स्पीडच्या वापरालाही कंटाळ असला तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. लवकरच भारतात 6G इंटरनेट स्पीड मिळणार आहे. देशात 5G लाँच होण्यास काहीसा उशीर झाला होता. मात्र आता 6G ची तयारी धुमधडाक्यात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (बुधवारी) इंडियाचे 6G व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. यासोबतच त्यांनी 6G संशोधन आणि विकास चाचणी बेड लॉन्च केला आहे. ITU (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन) एरिया ऑफिस आणि इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सादर केलेले हे डॉक्युमेंट देशात 6G तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी आणि अॅडॉप्सनसाठी उपयुक्त ठरतील, असा अंदाज आहे. (Prime Minister Narendra Modi has presented the India 6G vision document on Wednesday)

हे वाचलं का?

6G च्या व्हिजन डॉक्युमेंटशी संबंधित काही खास गोष्टी :

6G व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हे दशक हे भारतीय तंत्रज्ञानाचे आहे. भारताचे दूरसंचार आणि डिजिटल मॉडेल सरळ, सोपे, सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि चाचणी केलेले आहे.

6G व्हिजन डॉक्युमेंट कोणी तयार केले आहे?

6G व्हिजन डॉक्युमेंट टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केले आहे. या ग्रुपची सुरुवात नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती. या गटात विविध मंत्रालय आणि विभाग, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक, दूरसंचार सेवा प्रदाते आणि उद्योग क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. या गटाचे काम भारतात 6G लाँचसाठी रोडमॅप तयार करणे आहे.

गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई अटळ! हायकोर्टाचा दणका; नेमकं प्रकरण काय?

चाचणी बेडचा फायदा काय आहे?

6G व्हिजन डॉक्युमेंटसह, PM मोदींनी 6G चाचणी बेड लॉन्च केला. याच्या मदतीने उद्योग, शैक्षणिक संस्था आणि इतर प्लॅटफॉर्म विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेऊ शकणार आहेत.

सरकारचे मत काय आहे?

सरकारचं म्हणणं आहे की, भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट आणि 6G चाचणी बेडमुळे देशाला नवनवीन शोध, क्षमता वाढविण्यास आणि वेगाने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मदत होईल.

NCP: राष्ट्रीय दर्जा जाणार? शरद पवारांच्या नागालँडमधील खेळीमागे ‘हे’ होतं कारण!

6G बद्दल गतवर्षीच वर्तविण्यात आलं होतं भाकीत :

गतवर्षी ऑगस्टमध्ये, स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या सांगता सोहळ्यात, सरकारने 6G लॉन्चची तयारी सुरू केली असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं. 2030 पूर्वी 6G लाँच होण्याची शक्यता आहे. यासोबतच त्यांनी तरुण आणि नवनिर्मिती करणाऱ्यांना या संधीचा लाभ घेण्याबाबत आणि नवनवीन उपाय शोधण्याचं आवाहन केलं.

    follow whatsapp