प्रियांका चोप्रा घटस्फोट घेणार?; अभिनेत्रीने इन्स्टावरून हटवलं ‘जोनास’ आडनाव

मुंबई तक

• 04:43 PM • 22 Nov 2021

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत लोकप्रिय असलेलं कपल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्याबद्दल बुचकळ्यात टाकणारी माहिती समोर आली आहे. सोमवारी (22 नोव्हेंबर) प्रियांका चोप्राने अचानक आपल्या इन्स्टा बायोबमध्ये बदल केला आहे. प्रियांकाने बायोमधून जोनास आडनाव हटवल्यानं घटस्फोटासह विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. निक जोनाससोबत विवाहबद्ध झाल्यानंतर प्रियांका चोप्राने इन्स्टा बायोमधील नावात बदल केला […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत लोकप्रिय असलेलं कपल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्याबद्दल बुचकळ्यात टाकणारी माहिती समोर आली आहे. सोमवारी (22 नोव्हेंबर) प्रियांका चोप्राने अचानक आपल्या इन्स्टा बायोबमध्ये बदल केला आहे. प्रियांकाने बायोमधून जोनास आडनाव हटवल्यानं घटस्फोटासह विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

हे वाचलं का?

निक जोनाससोबत विवाहबद्ध झाल्यानंतर प्रियांका चोप्राने इन्स्टा बायोमधील नावात बदल केला होता. प्रियांका चोप्रा जोनास असा बदल तिने नावात केला होता. मात्र, अचानक बायोमध्ये बदल करत प्रियांकाने जोनास हे पतीकडील आडनाव काढून टाकलं आहे. इतकंच नाही तर प्रियांकाने स्वतःच आडनावही काढून टाकलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय झालं याबद्दल तर्कविर्तकांना उधाण आलं आहे.

प्रियांकाने इन्स्टा बायोमध्ये बदल केल्यानंतर प्रियांका आणि निक जोनासमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंकाही तिच्या काही चाहत्यांनी उपस्थित केली आहे. प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार असल्याचंही काहींनी ट्वीट करून म्हटलं आहे.

एका यूजर्सने ट्वीट करून म्हटलं आहे की, ‘निक आणि प्रियांकाचं ब्रेकअप झालं असं होऊच शकत नाही, असं मी म्हणणार होते. ते दोघं आताच दिवाळीला सोबत होते. पण, आता वाटतंय की मी चूक आहे.’ तर दुसऱ्या एका यूजरने ट्वीट करत निक आणि प्रियांकाचा घटस्फोट झालाय का?’, असा प्रश्न विचारला आहे.

आणखी एका यूजरने प्रियांका आणि निकमधील नात्याबद्दल ट्वीट केलं आहे. ‘मी म्हणतेय की निक आणि प्रियांकाच्या नात्यात काहीतरी गडबड सुरू आहे. ही गोष्ट मी तेव्हाच सांगितली होती, जेव्हा ते क्लीवलँडमध्ये होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र होतं, मात्र प्रियांका त्यांच्यासोबत नव्हती.’

समांथानंही काढून टाकलं होतं सासरकडचं नाव

काही महिन्यांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी समांथाने तिच्या इन्स्टा बायोमधून तिच्या सासरकडचं नाव काढून टाकलं होतं. बरेच दिवस मौन बाळगल्यानंतर तिने याबद्दल जाहीर केलं होतं.

    follow whatsapp