महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी चिंता वाढवली असून, पुण्यातही अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचंच गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. शहरातील पुणे स्टेशन ते माल धक्का दरम्यान येणाऱ्या एका सार्वजनिक शौचालयात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
पुणे स्टेशन ते माल धक्का चौक या येणार्या सार्वजनिक शौचालयमध्ये १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याच्या घटनेनं पुणे हादरलं. धक्कादायक बाब म्हणजे भरदुपारी ही घटना घडली आहे.
धक्कादायक! नागपूरमध्ये महिलेची हत्या, प्लास्टिकच्या पिशवीत आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन ते माल धक्का चौक दरम्यान एक सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या जवळपासच पीडित १२ वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहतात. शुक्रवारी (८ एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्या मागे एक व्यक्ती गेला.
शौचालयात गेलेल्या मुलीवर नराधमाने अत्याचार केला. ३५ वर्षीय आरोपीकडून मुलीवर शौचालयात अत्याचार सुरू असताना पीडित मुलीचा काका तिथे आला. त्यांनी दरवाजा वाजविला. त्याच क्षणी आरोपीने दरवाजा उघडून काकाला बाजूला ढकलून पोबारा केला.
डोकं नसलेला मृतदेह आढळला आणि चंद्रपूर हादरलं
झालेल्या प्रकाराबद्दल पीडित मुलीने सर्व हकिकत तिच्या काकाला सांगितली. कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी त्याच भागातील असल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT