समीर शेख, पिंपरी-चिंचवड
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी एका अशा मसाज पार्लरवर छापा टाकला आहे जिथे मसाज पार्लरच्या नावाखाली पीडित महिलांकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेण्यात येत होता.
पिंपरी येथील हॉटेल जिंजरलगत सुरू असलेल्या ‘Oregano SPA’ सलूनमध्ये हा अवैध धंदा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापेमारी केली.
तेव्हा या कारवाई दरम्यान पोलिसांनी 3 पीडित महिलांची सदर ठिकाणावरून सुटका केली. ज्यामधील 2 महिला नागालँडच्या तर एक महाराष्ट्राची राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अशा पद्धतीने भर शहरात देह विक्रीचा व्यापार चालवणाऱ्या पती व पत्नी यांना पोलिसांनी अटक केली असून देवेंद्र कुमार झा व स्नेही कुमारी झा अशी या दाम्पत्यांची नावे असून ते मूळचे झारखंड राज्याचे रहिवासी असल्याचीही माहिती पोलिसांमार्फत मिळाली आहे.
या आरोपी दाम्पत्याविरोधात ‘पिटा ॲक्ट’ प्रमाणे पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 3 हजार 800 रुपये रोख, एक मोबाइल फोन व इतर काही साहित्य देखील जप्त केले आहेत.
दरम्यान, महिलांना जबरदस्तीने देहविक्रीच्या गोरखधंद्यात ढकलणाऱ्या आरोपी दाम्पत्यावर कठोरात कठोर कारवाईची आता मागणी केली जात आहे.
डोंबिवलीतील सेक्स रॅकेट उदध्वस्त, 6 जणांना अटक
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुशिक्षित शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीमधील लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने ही कारवाई केली होती. ज्यावेळी 4 मुलींची सुटका करण्यात आली होती.
यावेळी लॉजिंग-बोर्डिंगच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात सेक्स रॅकेट सुरु असूनही याचा सुगावा स्थानिक पोलिसांना अनेक दिवस लागला नव्हता याबद्दल स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं होतं.
Sex Racket In Mumbai : अभिनेत्रीसह प्रसिद्ध मॉडल्सचा समावेश; जुहूतील हॉटेलवर पोलिसांची धाड
डोंबिवली पूर्व येथे सागर्ली चौक परिसरात बालाजी दर्शन नावाची इमारत आहे. या इमारतीत हॉटेल साईराज लॉजिंग आणि बोर्डिंग आहे. या लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती.
याच माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या पथकाने इथे छापा मारुन 4 तरुणींची सुटका केली होती.
ADVERTISEMENT