पुण्यातून अपहरण झालेला चार वर्षांचा डुग्गु सापडला, अपहरणाचं कारण मात्र गुलदस्त्यातच

मुंबई तक

• 10:33 AM • 19 Jan 2022

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पुणे येथील बालेवाडीतून अपहरण करण्यात आलेल्या स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या मुलाच्या शोधमोहीमेसाठीची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. डॉ. सतिश चव्हाण यांच्या मुलाचं अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांना आरोपीचा शोध घेणं खूप कठीण होऊन बसलं होतं. परंतू ८ दिवसांनी लहानग्या स्वर्णवचा (डुग्गुचा) शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. डॉ. सतिश […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पुणे येथील बालेवाडीतून अपहरण करण्यात आलेल्या स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या मुलाच्या शोधमोहीमेसाठीची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. डॉ. सतिश चव्हाण यांच्या मुलाचं अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांना आरोपीचा शोध घेणं खूप कठीण होऊन बसलं होतं. परंतू ८ दिवसांनी लहानग्या स्वर्णवचा (डुग्गुचा) शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

हे वाचलं का?

डॉ. सतिश चव्हाण यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांचे सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी डुग्गुचा शोध घेत होते. आरोपीने अपहरण केल्यानंतर एकही फोन केला नसल्यामुळे पोलीस अतिशय सावधतेने आणि गुप्तता पाळून हा तपास करत होते. अखेरीस आज वाकड भागातील पुनावळे येथे डुग्गु पोलिसांना सापडला.

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, युवकाला विवस्त्र करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

आपला मुलगा सापडल्यानंतर चव्हाण दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला असला तरीही स्वर्णवचं अपहण कोणी का केलं असेल याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती स्वर्णवला दुचाकीवरुन घेऊन जाताना दिसत होता. परंतू डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे आरोपीचा शोध घेणं पोलिसांना कठीण जात होतं. डॉ. सतिश चव्हाण यांनीही सोशल मीडियावर अपहरणकर्त्या आरोपीला विनंती करत आपल्याजवळील जे काही आहे ते तुला देतो पण माझ्या मुलाला सोड अशी विनंती केली होती. अखेरीस पुणे पोलिसांच्या या शोधमोहीमेला यश आलं आहे.

दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.

    follow whatsapp