ADVERTISEMENT
अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून म्हणजेच राधिका मर्चंट नुकतीच एका पार्टीत दिसली.
फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीत ‘मेरा नूर है मशहूर’ अशी थीम होती.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली.
यावेळी राधिका मर्चंटचा मनमोहक लूक पाहून सर्वंच घायाळ झाले.
गुलाबी रंगाची पेस्टल साडी, त्यावर डायमंड नेकलेस आणि कानातले परिधान करून ती खूपचं सुंदर दिसत होती.
साडीच्या बॉर्डरवर ऑफ व्हाइट रंगाची फ्रिल होती. तसंच, गोल्डन आणि सिल्व्हर रंगाची बॉर्डर होती.
साडीवर राधिकाने सिल्व्हर हेवी सुरोस्की वर्क असलेला ब्लाउज कॅरी केला होता.
राधिकाने न्यूड मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकही लावली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
तिच्या या लूकवर तिचे चाहते हे कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
ADVERTISEMENT