राहुल गांधींची भारत जोडो यात्रा विदर्भातून जात आहे. आज राहुल गांधींची संत गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध असलेल्या शेगावमध्ये सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी मन की बात वरून मोदींना डिवचलं. याच सभेत त्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबतचे अनुभव मांडले.
ADVERTISEMENT
राहुल गांधी शेगावच्या सभेत काय बोलले?
संत गजानन महाराज की जय म्हणत राहुल गांधी भाषणाला सुरूवात केली. “70 दिवसांपूर्वी कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू झाली. दररोज 25 किमी ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र आणि आता महाराष्ट्रात.”
“विरोधकांनी प्रश्न केला होता की, यात्रा कशाला हवी? यात्रेचा काय फायदा? देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. दहशत पसरवली आहे. जिकडे बघाल, तिकडे दहशत, द्वेष आणि हिंसा दिसेल. या तिरस्काराविरोधात ही यात्रा काढली आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं ‘ते’ पत्र आणलं समोर
“ही यात्रा मन की बात करण्यासाठी नाहीये. ही यात्रा तुमचा आवाज, तुमची वेदना समजून घेण्यासाठी आहे. मी विचार करतो की, भितीमुळे, तिरस्कारामुळे, हिंसेमुळे नुकसान होतं. द्वेषाने या देशाचा कधीही फायदा होणार नाही”, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना ‘मन की बात’ कार्यक्रमावरून डिवचलं.
शेतकरी आत्महत्यांबद्दल राहुल गांधी काय म्हणाले?
“विरोधक विचारतील की भिती कशाची, कोण घाबरलेलं आहे. ते जर या रस्त्यावरून चालले असते, तर पाच मिनिटांत त्यांना हे कळलं असतं. या भागात मागील सहा महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, का केल्या? काय कारण होती? कोणत्याही शेतकऱ्यांशी बोललं की तो म्हणेल, आम्हाला योग्य भाव मिळत नाही. हेच ऐकायला मिळत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या वीर सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे देशाची मान खाली गेली-चंद्रशेखर बावनकुळे
“दुसरा प्रश्न विचारला की सांगतात, आम्ही विमा भरला. वादळ आलं, एक रुपया मिळाला नाही. मग ते प्रश्न विचारतात की, राहुलजी सांगा, शेतकरी आत्महत्या करतो कारण 50 हजार, 1 लाख रुपये कर्ज असतं. हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत. ते विचारतात आम्ही काय चूक केली. आमचं 1 लाख कर्ज माफ होत नाही, पण उद्योगपतींचं लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ होतं, असं का?, असं ते विचारताहेत”, असं म्हणत राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला लक्ष्य केलं.
Rahul Gandhi : बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकार टीका
“हजारो तरुणांशी मी बोललोय. कुणाला इंजिनिअर व्हायचं. कुणाला वकील व्हायचं. कुणाला लष्करात जायचं आहे. प्रत्येक तरुणाच्या आईवडिलांनी कष्टाचे पैसे लावून शिक्षण दिलं. महाराष्ट्रात शिक्षण मोफत मिळत नाही. असं असताना ऐकायला काय मिळत, तर इंजिनिअर झालेलं आहे, पण नोकरी नाही”, असं म्हणत राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT