जळगावच्या एरंडोल तालुक्यातील ऊत्राण गावातील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर काल शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एरंडोल शहरातील रामलीला मैदानावर दुपारी लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
ADVERTISEMENT
भारतीय जवान राहुल पाटील अनंतात विलीन, भावपूर्ण श्रद्धांजली! ???
भारतीय जवान राहुल पाटील यांच्या पत्नीने फेसबुकवर '…
Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Saturday, February 6, 2021
राहुल पाटील हे पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात होते. गेल्या पाच फेब्रुवारीला कर्तव्यावर असताना राहुल पाटील यांना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा प्राण गेला. रविवारी सकाळी त्यांचं पार्थिव एरंडोल इथे दाखल झाले. कुटुंबिय आणि नातेवाईकांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरवात झाली.
ADVERTISEMENT