Konkan Rain: सिंधुदुर्गातही पावसाचा कहर, पुराचं पाणी शहरात घुसलं!

मुंबई तक

• 08:36 AM • 23 Jul 2021

किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे. दोडामार्ग – 184 (2500), सावंतवाडी – 210 (2750.10), वेंगुर्ला – 86.60(2154), कुडाळ – 126(2412), […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे.

सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे.

दोडामार्ग – 184 (2500), सावंतवाडी – 210 (2750.10), वेंगुर्ला – 86.60(2154), कुडाळ – 126(2412), मालवण – 27(2819), कणकवली – 185(2805), देवगड – 65(2339), वैभववाडी – 219(2830) मिलीमीटर असा पाऊस झाला आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला आहे. त्यानंतर मालवण, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून 39 हजार 641.83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये सध्या 424.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.80 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल 478.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात 68.1990 द.ल.घ.मी. पाणी साठा असून हा प्रकल्प 69.58 टक्के भरला आहे. सध्या या प्रकल्पातून 158.688 घ.मी. सेकंद विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शहरी भागात 8 ते 10 फुटापर्यंत पाणी शिरलं आहे.

आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

    follow whatsapp