चीन आणि पाकिस्तान सीमेवर मी एवढा बंदोबस्त आत्तापर्यंत पाहिलेला नाही. मग शेतकऱ्यांसाठी एवढा बंदोबस्त का करण्यात आला आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. शेतकरी आंदोलन चिघळू द्यायला नको होतं. त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि प्रत्येक राज्याप्रमाणे कायद्यात बदल केला गेला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कृषी कायदा गैर नाही, मात्र त्यातल्या तरतुदींचा फायदा एक-दोघांनाच होता कामा नये असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर, सचिन यांना ट्विट करायला सांगणं गैर
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांना कृषी कायद्यांसंदर्भात ट्विट करायला लावणं गैर. ही माणसं खूप मोठी आहेत. हे दोघेही भारतरत्नं आहेत. त्यांचा विचार मोदी सरकारने करायला हवा होता. अक्षय कुमारवर वगैरे आटपून टाकायचं होतं ना प्रकरण… या साध्या माणसांना ट्विट कशाला करायला सांगितलं आता सचिन ट्रोल होतो आहे.. त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
कोण ती बाई रिहाना?
रिहाना कोण कुठली बाई कुणी तिला ओळखत नव्हतं.. तुम्ही तरी तिला ट्विटच्या आधी ओळखत होतात का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तिने एक ट्विट केल्यावर तिच्या ट्विटला सरकारने उत्तर दिलं? काय गरज होती असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बातमध्ये सांगितलं की एक फोन कॉलचं अंतर आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक फोन करावा आणि आंदोलन संपवून टाकावं. किती दिवस हा प्रश्न चिघळवणार? आणत असलेला कायदा चांगला आहे काही त्रुटी असतील.. पण एक दोघांचा फायदा होऊ नये एवढंच आपल्या देशवासीयांना वाटतं आहे त्यात काही गैर नाही.
शेतकरी आंदोलन गेल्या 72 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरु आहे. आजवर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या मात्र यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरुच आहे. या सगळ्या आंदोलनावर आज राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT