मुंबईसह काही शहरांत कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून, महाराष्ट्रात सध्या मास्क मुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीबद्दल चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर हा मु्द्दा चर्चेत आला. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओमिक्रॉन व्हेरियंट पाठोपाठ आता कोरोनाचा NeoCoV हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘एका नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू झाली आहे. तो फार जीवघेणा आहे, असं मी वाचलं आहे. जागतिक आरोग्य संघटना त्याचा अभ्यास करत आहे.’
‘त्या व्हेरियंटबद्दल असं सांगण्यात आलं आहे की, त्याचा मृत्यूदर खूप जास्त आहे. त्याचबरोबर संसर्गाचा वेग ओमिक्रॉन इतकाच आहे. WHO त्याचा अभ्यास करत आहे. त्याचा अद्याप कुठेही संसर्ग झालेला नाही. त्याबद्दलची एक छोटं टिपण आलेलं आहे, पण आजतरी त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात १०३ रुग्णांचा मृत्यू; पुण्यात आढळले सर्वाधिक रुग्ण
तिसऱ्या लाटेबद्दलही आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली. ‘कोरोनाचा पीक येऊन गेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये वेगाने रुग्णसंख्या वाढत होती. ती आता तशी वाढत नाही. मात्र, राज्याच्या इतर भागांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्येही वाढत आहे. मात्र, चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. कारण पाच-दिवसांत बरे होत आहेत. त्यांना जास्त उपचारांची गरज पडत नाहीये,’ असं राजेश टोपे म्हणाले.
‘९० ते ९५ टक्के बेड्स रिकामे आहेत. ५ ते ७ टक्केच बेड्सवरच रुग्ण भरती करण्यात आलेले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णही १ टक्क्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे या सगळी परिस्थिती लक्षात घेतली, तर संसर्गाचा विषय आहे. बहुतांश लोक घरीच क्वारंटाईन आहेत. जे निर्बंध लावण्यात आले आहेत ते ठेवले पाहिजे की थांबवले पाहिजे, याबद्दल टास्क फोर्सनं मार्गदर्शन करायला हवं. योग्य मार्गदर्शन करण्यात आलं, तर लोकांना निश्चितपणे दिलासा मिळेल,’ असं टोपे म्हणाले.
ब्लॅक फंगस पुन्हा डोकं वर काढणार? मुंबईत पहिला रूग्ण आढळल्यानंतर काय म्हणत आहेत तज्ज्ञ?
मास्क मुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरही टोपे यांनी म्हणणं मांडलं. ‘मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हणालो नाही. मला एवढंच सांगायचं की, इग्लंड, डेन्मार्क, युरोपियन देशांमध्ये झालेल्या निर्णयावर आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्या देशांनी कोणत्या वैज्ञानिक आधारावर निर्णय घेतले याबद्दल केंद्राच्या टास्क फोर्स आणि राज्याच्या टास्क फोर्स माहिती विचारावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला केली होती.’
Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
‘मास्क मुक्ती इतकाच विषय नाही. त्यांनी बरेच निर्बंध कमी केले आहेत. त्याबद्दल आयसीएमआरने मार्गदर्शन करावं. मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे. याबद्दल आम्ही केंद्राला आणि आयसीएमआरला पत्र लिहिणार आहोत. युरोपियन देशांमध्ये कोविडसह आयुष्य हे धोरण स्वीकारलं आहे. त्यांनी कोणत्या पद्धतीने नियोजन केलं आहे. त्याबद्दल टास्क फोर्सने मार्गदर्शन करणं आवश्यक आहे,’ असं टोपे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT