Rajya Sabha Election: मार्क्सवादी पक्षाचे एक मत कोणाला? पक्षाने जाहीर केली भूमिका

मुंबई तक

• 08:57 AM • 08 Jun 2022

मुंबई: राज्यात येत्या दहा तारखेला राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जांगासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची मतांची जुळवाजुळव सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत एका मतालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहे ते मतदान कोणाला करणार हे गुलदस्त्यात होते परंतु आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. पक्षाचे राज्य […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यात येत्या दहा तारखेला राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जांगासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची मतांची जुळवाजुळव सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत एका मतालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहे ते मतदान कोणाला करणार हे गुलदस्त्यात होते परंतु आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी माध्यमांसमोर आपले एक कोणाला देणार याची अधिकृत घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

डॉ. उदय नारकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्या पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी बोलणे केले आहे. महाविकास आघाडीने आमच्या मताचा पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महागाईने, कामगार, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी आणि महिलांच्या वाईट स्थितीला भाजप जबाबदार आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान राज्यात येत्या दहा तारखेला सहा जागांसाठी मतदान होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात आहेत. खरी लढत ही शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात आहे. राज्यात सर्व संघर्ष हा या सातव्या जागेसाठी आहे. एमआयमचे राज्यात दोन आमदार आहेत त्यांनी अजून आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी जाहीर मदत मागावी असे ओवेसी म्हणाले आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विधानसभा सदस्य विनोद निकोले हे घोडेबाजारापासून दूर असून ते या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असं नारकर यांनी स्पष्ट केलं. अजून कोणत्या पक्षाला किती आमदरांची गरज आहे हे स्पष्ट होत नाहीये. भाजप आणि महाविकास आघा़डीला आमचाच उमेदवार निवडून येईल अशी आशा आहे.

    follow whatsapp