Live Update : राज्यसभा निवडणूक : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित

मुंबई तक

• 04:01 PM • 10 Jun 2022

राजस्थान : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित महाराष्ट्रासह चार राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. राजस्थानातील निकाल लागले असून, काँग्रेसने तिन्ही जागांवर विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत भाजपने आमदार शोभाराणी खुशवाह यांना निलंबित केल्याची माहिती आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं भाजपतील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिलीये. कुशवाह यांनी क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आलीये. BJP suspends Rajasthan […]

Mumbaitak
follow google news

राजस्थान : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित

हे वाचलं का?

महाराष्ट्रासह चार राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. राजस्थानातील निकाल लागले असून, काँग्रेसने तिन्ही जागांवर विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत भाजपने आमदार शोभाराणी खुशवाह यांना निलंबित केल्याची माहिती आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं भाजपतील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिलीये. कुशवाह यांनी क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आलीये.

ई़डीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झालाय; संजय राऊत भडकले

भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

“राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!,” अशी टीका संजय राऊतांनी केलीये.

शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजपपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शिवसेनेनं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यांची मतं बाद ठरवण्याची मागणी शिवसेनेनं आयोगाकडे केली आहे.

राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेत भाजपने थेट दिल्लीत धाव घेतली आहे.

भाजपने तिघांची मते बाद करण्यासंदर्भात थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना भाजपने पत्र दिलं असून, आता त्यावर निकाल झाल्यानंतर मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे राज्यसभेचे निकाल येण्यास मध्यरात्रही होऊ शकते.

सहाव्या जागेवर कोण मारणार बाजी?

मतमोजणीला पाच वाजेपासून सुरूवात होणार होती, मात्र भाजपकडून मतदानाबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत. त्या आक्षेपांवर निर्णय झाला नाही. त्यामुळे मतमोजणी सुरू होण्यास विलंब होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे निकाल येण्यास उशिर होणार आहे.

भाजपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतांबद्दल आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे या आक्षेपांवर निर्णय झाल्यानंतर मतमोजणीला सुरूवात होईल.

राज्यसभेसाठी मतदान पूर्ण! आता प्रतिक्षा निकालाची

राज्यसभा निवडणुकीसाठीची मतदान पार पडलं आहे. एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आलं नाही. दरम्यान, मतदान पूर्ण झाल्यानंतर आता निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून चारही उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भाजपनंही तिन्ही उमेदवार विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीसह कुणी-कुणी केलं मतदान ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना शिवसेनेची १४ मते मिळाली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची ९, काँग्रेसची २, समाजवादी पार्टीची २, बच्चू कडू यांच्या प्रहारची २, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजेंद्र यड्रावरकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, शंकरराव गडाख, आशिष जयस्वाल यांनी मतदान केल्याची माहिती आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत २८२ आमदारांनी मतदान केलं. सध्या तीन आमदारांचं मतदान बाकी आहे.

‘बविआ’ची मतं महाविकास आघाडीला?

राज्यसभा निवडणुकीत बेरजेच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ते कुणाला मतदान करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दरम्यान आज मतदानासाठी आल्यानंतर विधानभवन परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे बविआची मते आघाडीला मिळणार का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

“संजय जाणार हे नक्की, कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही”

“100 टक्के विजय आमचा होणार आहे. 100 टक्के आत्मविश्वास आहे. धाकधूक नाही. कारण धाक फक्त फडणवीसांचा आहे आणि धूक महाविकास आघाडीची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बऱ्याच लोकांना विचारलं तर ते म्हणे महाभारतात जसा अश्वत्थामा गेला तसा या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणारे एवढं नक्की आहे. अश्वत्थामा कोणता गेलेला ते धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणारे हे मी सांगणार नाही,” असं विधान अनिल भोंडे यांनी केलं आहे.

राज्यसभा निवडणूक : २३८ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. आतापर्यंत एकूण आमदारांपैकी २३८ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. आतापर्यंतच्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांनी शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनी पहिल्या पसंतीचं मत दिलं आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमख यांची मतदान करण्यास परवानगी देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.

यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार. भाजपने काटे पेरले आहे. बाभळीच्या झाडाला आंबे कसे येतील? भाजपची उलटी गिनती सुरू झालीये. एमआयएमचे आमदार आम्हाला मतदान करू इच्छित आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. ईडी पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. ईडी न्यायालयात सांगते की त्यांना मतदानाचा अधिकार नाही. यातूनच दिसत की, ईडीवर भाजपचा किती दबाब आहे,” असं काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Rajya Sabha Election : काय केल्याने आमदाराचं मत होईल बाद? Rajya sabha : आजाराने त्रस्त असूनही भाजपचे लक्ष्मण जगताप करणार मतदान, रूग्णवाहिकेतून मुंबईत बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?

    follow whatsapp