ADVERTISEMENT
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूर विभागाचे प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, शिवसेनेकडून संजय राऊतांना पुन्हा उमेदवारी दिली जणार हे आधीच निश्चित झालं होतं.
सहाव्या जागेवर भाजप आणि महाविकास आघाडीकडे पुरेसे मतं नसल्यानं छत्रपती संभाजीराजे यांनी सर्व पक्षांना पाठिंबा मागितला होता.
शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी मात्र, संजय पवार यांना उमेदवारी दिली. गुरुवारी दुपारी १ वाजता संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
संजय राऊत यांचा उमेदवारी आवाज दाखल करण्यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, अरविंद सावंत हेही हजर होते.
ADVERTISEMENT