याअभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत बरी नसल्याची माहिती देण्यात आली होती. तर रणबीरची आई नितू कपूर यांनी रणबीरला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
नितू कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. नितू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर रणबीरचा फोटो शेअर करत त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलंय. नितू त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “रणबीरची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. तो औषधोपचार घेत असून त्याची प्रकृती सुधारतेय. तो घरीच क्वारंटाईन झाला आहे. “
तर अभिनेता रणबीर कपूरनंतर दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या संजय लीला भन्साळी क्वारंटाईनमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संजय यांचा आगामी सिनेमा गंगूबाई काठियावाडी दरम्यान कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. सध्या तरी गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं शूटींग थांबवण्यात आलं आहे.
याशिवाय अभिनेत्री आलिया भट्टने देखील स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून ठेवलं आहे. तर ज्या व्यक्ती संजय लीला भन्साळी यांच्या संपर्कात आल्या आहेत. त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली आहे.
ADVERTISEMENT