Nude Photo Shoot : रणवीर सिंग विरोधात FIR दाखल, तुरुंगात जावं लागणार?

मुंबई तक

• 09:34 AM • 26 Jul 2022

Ranveer Sing Nude Photo Shoot : अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच या फोटोशूट प्रकरणी मुंबईत रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी FIR नोंदवून घेतला आहे. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंगला तुरुंगवास भोगावा लागू शकतो अशी चर्चा आहे. […]

Mumbaitak
follow google news

Ranveer Sing Nude Photo Shoot : अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच या फोटोशूट प्रकरणी मुंबईत रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी FIR नोंदवून घेतला आहे. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंगला तुरुंगवास भोगावा लागू शकतो अशी चर्चा आहे.

हे वाचलं का?

रणवीर सिंगच्या विरोधात कुठल्या कलमांन्वये एफआयआर?

रणवीर सिंगच्या विरोधात कलम २९२, २९३, ५०९ तसंच आयटी अॅक्ट च्या कलम ६७ ए अन्वये केस दाखल करण्यात आली आहे. ज्या कलमांच्या अंतर्गत रणवीर सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा विचार केला तर रणवीर सिंगला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. रणवीरच्या विरोधात आयटी अॅक्ट ६७ ए अन्वये गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात जामीनही मिळत नाही. महिलांचा अपमान करणं आणि त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवणं यासाठीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीसीचं कलम २९२ च्या अंतर्गत अश्लीलतेचा वापर करण्यात आला आहे. कुठलाही पेपर, पॅम्पलेट किंवा पुस्तकात, मॅगझिन, लेख, ड्रॉईंग यातून अश्लील साहित्य, फोटो, मजकूर प्रचारीत केला गेला तो पाहून, वाचून लोकांचा भावना भ्रष्ट झाल्या तर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात दोषी असल्यास २ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

कलम २९३ च्या अन्वये २० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीने अश्लील साम्रुगी विकली किंवा प्रदर्शित केली किंवा तसा प्रयत्न केला तर शिक्षा होते. पहिल्यांदा या प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षे शिक्षा आणि दोन हजार रूपये दंड अशी तरतूद आहे.

कलम ५०९ स्त्रियांचा अपमान करणं, त्यांचा अनादर करणं, या सगळ्या तरतुदी आहेत. या कलमान्वये गुन्हा दाखल केला गेला असेल तर पाच वर्षांची शिक्षा केली जाण्याची तरतूद आहे. तसंच १० लाख रूपयांच्या दंडाचीही तरतूद आहे.

रणवीरचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत

अभिनेता रणवीर सिंग जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो, त्यापेक्षा जास्त चर्चा असते त्यांच्या फॅशन सेन्सची. यावेळी रणवीर सिंग सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने केलेलं न्यूड फोटोशूट! बॉलिवूडमधील उत्साही अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंगने मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी काहीतरी हटके गोष्टी करून चाहत्यांचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. नेहमी वेगवेगळ्या वेशभूषा करणाऱ्या रणवीर सिंग यावेळी जे केलंय, त्याची कुणी कल्पनाही केली नसेल आणि त्यामुळेच लोक त्यावरून जोक करत आहेत. मात्र महत्त्वाचं आहे ते दीपिका पदुकोणचं म्हणणं आहे.

रणवीरच्या न्यूड फोटोंबाबत काय म्हटलंय दीपिका पदुकोणने?

रणवीरचे हे फोटो पाहून मी खूपच इंप्रेस झाले. मला या फोटोशूटची संकल्पना आवडली होती. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मला ते फोटो आवडले होते. हे दीपिका पदुकोणने म्हटलं आहे. दीपिका पदुकोणच्या या वक्तव्यानंतर त्याची खूप चर्चा होते आहे.

दीपिका पदुकोणनंतर या फोटोशूटबद्दल रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडेकडेही प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने हे सांगितलं की रणवीरचे असे फोटोशूट होणार आहेत त्याचं नियोजन आधीच झालं होतं. रणवीर सिंगला या शूटबद्दल सर्वकाही स्पष्टपणे माहिती होते. तो ते करण्यास फार उत्सुक होता. रणवीर हा दररोज विविध फॅशनचे कपडे परिधान करत असतो. त्याच्या निवडीबद्दल चाहतेही त्याचे कौतुक करतात. त्यामुळे रणवीरने न्यूड फोटोशूट करणं ही इतकी मोठी बाब नक्कीच नाही, असंही या व्यक्तीने सांगितलं.

    follow whatsapp