Rape Case: 38 वर्षीय महिलेवर 24 वर्षीय तरुणाकडून बलात्कार, पुण्याहून परळीला आणून महिलेवर अत्याचार

मुंबई तक

• 07:10 AM • 22 Nov 2021

रोहिदास हातागळे, बीड परळीत नोकरीला लावतो, रूम बघून देतो असे सांगून सोलापूरच्या एका 38 वर्षीय महिलेला पुण्याहून (Pune) परळीला आणि तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार (Rape Case) केल्याप्रकरणी परळी (Parali) शहर पोलिसात परळीच्या एका 24 वर्षीय युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता बीड जिल्ह्यातील परळीत देखील एका […]

Mumbaitak
follow google news

रोहिदास हातागळे, बीड

हे वाचलं का?

परळीत नोकरीला लावतो, रूम बघून देतो असे सांगून सोलापूरच्या एका 38 वर्षीय महिलेला पुण्याहून (Pune) परळीला आणि तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार (Rape Case) केल्याप्रकरणी परळी (Parali) शहर पोलिसात परळीच्या एका 24 वर्षीय युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता बीड जिल्ह्यातील परळीत देखील एका 38 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी परळी येथील रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी (वय 24 वर्ष) राहणार जंगम गल्ली, गणेशपार,परळी वैजनाथ याने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय महिलेला पुण्याहून परळीला आणले.

परळी येथे तुला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून तो तिला परळीला घेऊन आला. असे या महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. परळीत आल्यानंतर रूम बघून देतो असे म्हणून दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री आणि 20 नोव्हेंबर रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला.

कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही. तसेच इथेच मारुन टाकेन अशी जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडित महिलेला दिली. या महिलेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पेंटकर हे करीत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी तरुणाचा पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत. तसेच पीडित महिलेला देखील वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचं मोठं आव्हान परळी पोलिसांसमोर असणार आहे.

अल्पवयीन मुलगा दोन वर्षांपासून करत होता बलात्कार; १६ वर्षाच्या मुलीने बाळाला दिला जन्म

पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने ती देखील प्रचंड घाबरलेली आहे. त्यामुळे आरोपीला तात्काळ गजाआड करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून यासाठी वेगवेगळ्या टीमही तयार करण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp