लग्नाचं खरं वचन देऊन शरीर संबंध प्रस्थापित करणं हा बलात्कार नाही-कोर्ट

मुंबई तक

• 06:43 AM • 08 Apr 2022

लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याच्या तक्रारी येणं हे अगदीच नित्याचं झालं आहे. अनेकदा पोलीस ठाण्यात अशा तक्रारी येतात. खासकरून जर प्रेमी युगुल हे सज्ञान आहे आणि त्यातल्या पुरूषाने लग्नाचं वचन देऊन मुलीशी सहमतीने शरीर संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा होईल? मात्र त्यासंबंधीच्या तक्रारी येतात. दिल्ली हायकोर्टाने नेमकी हीच बाब लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय […]

Mumbaitak
follow google news

लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याच्या तक्रारी येणं हे अगदीच नित्याचं झालं आहे. अनेकदा पोलीस ठाण्यात अशा तक्रारी येतात. खासकरून जर प्रेमी युगुल हे सज्ञान आहे आणि त्यातल्या पुरूषाने लग्नाचं वचन देऊन मुलीशी सहमतीने शरीर संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा होईल? मात्र त्यासंबंधीच्या तक्रारी येतात. दिल्ली हायकोर्टाने नेमकी हीच बाब लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

हे वाचलं का?

दिल्ली न्यायालयात या प्रकरणी एक सुनावणी सुरू होती. ज्या दरम्यान एका व्यक्तीचे एका महिलेसोबत दीर्घ काळ शरीर संबंध प्रस्थापित झाले होते. एवढंच नाही तर त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र काही कारणामुळे या दोघांचं लग्न होऊ शकतलं नाही आणि त्यांचं नातं तुटलं. दिल्ली न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी खालच्या कोर्टाचा निर्णय निकाली लावला. यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं होतं की संबंधित पुरूषाने महिलेला लग्नाचं वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला.

मात्र आता दिल्ली कोर्टाने असा निकाल दिला आहे की लग्नाचं वचन देऊन जर एखाद्या जोडप्यात सहमतीने शारिरीक संबंध प्रस्थापित झाले तर तो बलात्कार आहे असं म्हणता येणार नाही असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

    follow whatsapp