बलात्कारला विरोध करणाऱ्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड,डोक्यात दगड घालून हत्या

मुंबई तक

• 10:45 AM • 12 Apr 2022

एका दिव्यांग महिलेसोबत जे काही घडलं ती घटना क्रौर्याचा कळस दाखवणारी आहे. या घटनेमुळे कुणाचाही संताप होऊ शकतो. ही दिव्यांग महिला अंधारात एकटी होती ते पाहून एका माणसाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्या माणसाचा कडाडून विरोध केला. ज्यामुळे त्या तरूणाला संताप आला. त्याने लोखंडी रॉडने महिलेला मारहाण केली. हा तरूण इतका रागात […]

Mumbaitak
follow google news

एका दिव्यांग महिलेसोबत जे काही घडलं ती घटना क्रौर्याचा कळस दाखवणारी आहे. या घटनेमुळे कुणाचाही संताप होऊ शकतो. ही दिव्यांग महिला अंधारात एकटी होती ते पाहून एका माणसाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्या माणसाचा कडाडून विरोध केला. ज्यामुळे त्या तरूणाला संताप आला. त्याने लोखंडी रॉडने महिलेला मारहाण केली.

हे वाचलं का?

हा तरूण इतका रागात होता की त्याने तोच लोखंडी रॉड महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला. तिला फरफटत झुडपांमध्ये घेऊन गेला त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या महिलेची डोक्यात दगड टाकून हत्या केली. छत्तीसगढमधल्या जांजगीर-चांपा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

या महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर तिच्यासोबत जी क्रूर घटना घडली ती पोलिसांना समजली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सगळा तपास करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या चौकशीत ही सगळी संतापजनक घटना समोर आली आहे.

विकृत वासनेने हपापलेले नराधम… जंगलात जाऊन घोरपडीवर बलात्कार

छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा भागात ही घटना घडली आहे. ही महिला रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ५८ वर्षांची होती आणि मानसिक दिव्यांग होती. ही घटना जिथे घडली त्या भागापासून लांब असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेचा छडा लागला.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक या महिलेला खेचत घेऊन जात होता. किशन यादव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी किशनने पोलिसांना सांगितलं जेव्हा मी या महिलेवर बलात्कार करत होतो तेव्हा ती मला धक्का देऊन विरोध करत होती. त्यावेळी मला तिचा प्रचंड राग आला. त्यानंतर मी तिला रॉडने मारहाण केली तसंच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तो रॉड घातला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घतला अशी कबुली या नराधमाने दिली आहे.

    follow whatsapp