Rave Party : आर्यन खानसह रेव्ह पार्टीतील आठ जणांची नावं आली समोर; NCB ने दिली माहिती

मुंबई तक

• 06:54 AM • 03 Oct 2021

मुंबई गोव्याला जात असलेल्या क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा एनसीबीने शनिवारी पर्दाफाश केला. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आले असून, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांची नावं समोर आली आहेत. कॉर्डेलिया क्रूझच्या जहाजावर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी धाड टाकली. या कारवाईवेळी अनेकजण अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं दिसून आलं. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई गोव्याला जात असलेल्या क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा एनसीबीने शनिवारी पर्दाफाश केला. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आले असून, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांची नावं समोर आली आहेत.

हे वाचलं का?

कॉर्डेलिया क्रूझच्या जहाजावर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी धाड टाकली. या कारवाईवेळी अनेकजण अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर काही जणांच्या बॅगेमध्येही ड्रग्ज आढळून आले.

Rave Party : काहीजणांच्या बॅगेत सापडले ड्रग्ज;
‘कॉर्डेलिया’च्या अध्यक्षांनी दिली माहिती

या प्रकरणी एनसीबीने आठ जणांना अटक केली असून, मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी याबद्दल माहिती दिली. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकेर, गोमित चोप्रा या आठ जणांची रेव्ह पार्टी प्रकरणी चौकशी केली जात आहे, असं वानखेडे म्हणाले.

Rave Party : शाहरुख खानचा मुलगा आर्यनची ‘एनसीबी’कडून चौकशी; 8 जणांना अटक

रेव्ह पार्टी प्रकरणाबद्दल बोलताना एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान म्हणाले, ‘हा दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तपास कार्याचा परिणाम आहे. आम्ही गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई केली. या प्रकरणात काही बॉलिवूडशी संबंधित असलेल्यांचा सहभाग यातून समोर आला आहे’, असं प्रधान म्हणाले.

एनसीबीला माहिती मिळाल्यानंतर अधिकारी प्रवाशांच्या वेशात जहाजात दाखल झाले होते. पार्टी सुरू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यात काहीजणांच्या बॅगेत ड्रग्ज सापडले. याला कॉर्डेलिया क्रूझेसचे अध्यक्ष बैलोम यांनीही दुजोरा दिला आहे.

जहाज मुंबईच्या समुद्री हद्दीतून बाहेर पडल्यानंतर आणि मध्य समुद्रावर पोहोचल्यावर रेव्ह पार्टी सुरु झाली. रेव्ह पार्टीला सुरूवात झाल्यानंतर प्रवाशांच्या वेशात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनेकांना अंमली पदार्थांचं सेवन करताना ताब्यात घेतलं.

    follow whatsapp