आमदार होताच धंगेकरांचे फडणवीसांना खडेबोल! हेमंत रासने भडकले, म्हणाले…

मुंबई तक

• 03:20 AM • 05 Mar 2023

Ravindra Dhangekar । Devendra fadnavis । Hemant Rasane । Kasba Peth । Pune: गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर (Kasba Peth Bypoll) होतं. कसब्यात कोण आमदार होतंय, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. शिंदे-फडणवीसांनी रोड शो, त्याचबरोबर सभा या भागात घेतल्या, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार केला. बड्या नेत्यांच्या या […]

Mumbaitak
follow google news

Ravindra Dhangekar । Devendra fadnavis । Hemant Rasane । Kasba Peth । Pune: गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर (Kasba Peth Bypoll) होतं. कसब्यात कोण आमदार होतंय, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. शिंदे-फडणवीसांनी रोड शो, त्याचबरोबर सभा या भागात घेतल्या, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार केला. बड्या नेत्यांच्या या प्रचारामुळे कसबा पोटनिवडणुक अत्यंत महत्त्वाची झाली होती. अखेर कसबा पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. धंगेकरांच्या विजयानंतर मोठा जल्लोष महाविकास आघाडीकडून करण्यात आला. जिंकल्यानंतर धंगेकरांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या. यावेळी एका मुलाखतीमध्ये धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला.

हे वाचलं का?

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची आणि राजकीय नेत्यांची परंपरा राहिली आहे. पण याला फडणवीस अपवाद आहेत. फडणवीसांचं राजकारण कुरघोडीचं, दुश्मनीचं आणि दबावाचं राहिलेलं आहे.”

धंगेकर पुढे म्हणाले, “विरोधकांना पूर्णपणे संपवायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं हाच अजेंडा घेऊन फडणवीस काम करतात. आज सत्तेत असल्याने लोक त्यांना नमस्कार करतात. पण, सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील करणार नाहीत. फडणवीसांच्या राजकारणाचा शेवट चांगला होणार नाही, फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील”, अशी टीका धंगेकरांनी केली होती.

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांना काय उत्तर दिलं?

आमदार रवींद्र धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर अशी घणाघाती टीका केल्यानंतर पराभूत उमेदवार हेमंत रासने चांगलेच भडकले.

रासने यांनी दोन ट्विट करत रवींद्र धंगेकरांचा समाचार घेतला. रासने त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले, “रवीभाऊ, आपण विजयी झालात. त्याबद्दल आपले अभिनंदन. आपण देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्रजींनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा. देवेंद्रजींच्या कारकिर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत.”

कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’

प्रचाराच्या धामधुमीमध्ये रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात रंगलेलं वाकयुद्ध सर्वांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलेल्या हु इज धंगेकर या प्रश्नाला रवींद्र धंगेकरांनी देखील त्यांच्या शैलीत उत्तर दिलं होतं. आता निवडून आल्यानंतर दोनच दिवसात धंगेकर आणि रासने यांच्यात वाकयुद्ध रंगल्याने पुण्याच्या राजकारणात काय काय होणार हे औत्सुक्याचं असणार आहे.

    follow whatsapp